Showing posts with label 17may. Show all posts
Showing posts with label 17may. Show all posts

Friday, 19 May 2023

17 मे दिनविशेष - गणितज्ञ राधानाथ सिकदर स्मृतिदिन

17 मे दिनविशेष - गणितज्ञ राधानाथ सिकदर स्मृतिदिन
जन्म - ५ ऑक्टोबर १८१३ (कोलकाता)
स्मृती - १७ मे १८७० (हुबळी,पश्चिम बंगाल)


राधानाथ सिकदर भारत के महान गणितज्ञ थे। उन्होने सबसे पहले सन १८५२ में एवरेस्ट की ऊँचाई की गणना की थी। उनकी स्कूली शिक्षा Phiringi कमल बोस स्कूल और हिंदू स्कूल, कोलकाता में हुई थी। वे विज्ञान की ओर आकर्षित हुए और बाद में इसे अपने विषय के रूप में लिया। बचपन से ही उनको गणित विषय में रूचि थी। जब १८३१ में भारत के सर्वेयर जनरल जॉर्ज एवेरेस्ट एक होशियार, जवान, गणितशास्त्री जो गोलाकार त्रिकोणमिती में होशियार हो, ऐसे नवयुवक को खोज रहे थे। तब हिन्दू कोलेज के प्रोफेसर टेटलर ने अपने विद्यार्थी राधानाथ सिकदर का नाम सजेस्ट किया। प्रोफेसर का उत्साह देखकर जॉर्ज एवेरेस्ट ने राधानाथ सिकदर को अपने साथ ले लिया। साल 1852 के आसपास का वक्त रहा होगा। एक रोज सुबह सवेरे सर्वे जनरल ऑफ इंडिया के डॉयरेक्टर ‘एंड्रयू स्कॉट वा’ अपने दफ्तर में थे। उनके साथ दूसरे कर्मचारी भी दफ्तर पहुंच कर काम में व्यस्त हो चले थे। उसी वक्त एक शख्स तूफान की तरफ ‘स्कॉट’ के कमरे में दाखिल होता है और खुशी से चींखते हुए कहता है, "सर, मैंने दुनिया की सबसे ऊंची पर्वत चोटी का पता लगा लिया है।" यह सुनकर स्कॉट हक्के-बक्के रह जाते हैं. वह शख्स आगे बताता है कि, सबसे ऊंची चोटी 29002 फीट है। कालांतर में ‘सर्वे ऑफ इंडिया‘ के पूर्व डॉयरेक्टर जॉर्ज एवरेस्ट के नाम पर उस पर्वत का नाम ‘माउंट एवरेस्ट’ रखा गया|

17 मे दिनविशेष - संशोधक डॉ. एडवर्ड जेन्नर जन्मदिन

17 मे दिनविशेष - संशोधक डॉ. एडवर्ड जेन्नर जन्मदिन
जन्म - १७ मे १७४९ (बर्कले,इंग्लंड)
स्मृती - २६ जानेवारी १८२३ (बर्कले,इंग्लंड)


काही शास्त्रज्ञ त्यांचे संशोधन व निष्कर्ष याबद्दल इतके ठाम असतात, की त्याचे प्रयोग स्वत:वरही करण्याची त्यांची तयारी असते. डॉ. जेन्नर यांनी त्या पुढची पायरी गाठत देवीसारख्या त्या काळी असाध्य मानल्या जाणार्‍या आजाराची लस आपल्या ११ महिन्यांच्या मुलाला टोचली. ज्ञानाच्या इतिहासामध्ये अनेक संशोधकांनी आपले संशोधन पूर्णत्वास नेण्यासाठी धाडसी प्रयोग केलेले आहेत. हे प्रयोग मुख्यत: उपकरणाच्या उपयोगाच्या बाबतीत होते. जेन्नर यांनी केलेले प्रयोग मात्र तरुण आणि लहान मुलांच्या संबंधातील होते. विशेष म्हणजे, त्यांना आपल्या संशोधनाविषयी आणि आपण केलेल्या अनुमानाविषयी एवढी खात्री होती, की त्यांनी त्यांच्या संशोधनाचा प्रयोग स्वत:च्या ११ महिन्यांच्या मुलावर केला. अठराव्या शतकात जगातील अनेक देशांमध्ये 'देवी' हा रोग अतिशय दुर्धर असा मानला जाई. देवीची लागण झाल्यामुळे शरीरावर अनेक विपरित परिणाम होत आणि काही लोकांना अंधत्व येत असे. त्याचप्रमाणे अनेक मुले या रोगाला बळी पडत.


एखाद्या समस्येने अनेक जण ग्रस्त असतात. मात्र, ती समस्या सोडविण्याचा प्रयत्न करणार्‍या व्यक्तींची संख्या अगदीच कमी असते. जेन्नर हे तरुणपणी जॉन हंटर या शल्यविशारदाबरोबर त्यांचे साहाय्यक म्हणून काम करीत होते. जॉन हंटर यांनी त्यांना एक कानमंत्र दिला होता. तो म्हणजे 'विचार करू नका, प्रयत्न करा.' जेन्नर यांनी छातीमध्ये होणार्‍या वेदनांचे मूळ शोधण्याचा प्रयत्न केला. अठराव्या शतकात युरोपमध्ये आपल्याकडील झोपडपट्टींशी साम्य दाखवणारी वसाहत होती. त्यामुळे तेथेही डास, पिसवा यांसारख्या कीटकांचा प्रादुर्भाव होता. त्यामुळे पिसवांपासून होणार्‍या रोगावरही त्यांनी संशोधन केले.


हे संशोधन करीत असताना 'देवी' या रोगामुळे होणार्‍या 'अपरिमित नुकसानी' कडे त्यांचे लक्ष गेले. त्या काळी देवी हा रोग असाध्य मानला जाई. त्याचा होणारा प्रादुर्भाव इतका प्रचंड होता, की जवळ जवळ ६० टक्के लोकांना त्याची लागण होत असे. या लागण झालेल्या लोकांपैकी २० टक्के लोक, तर मृत्युमुखी पडत. त्याचप्रमाणे चेहरा विद्रूप होणे, दृष्टीवर परिणाम होणे यांसारख्या गोष्टी घडून येत. देवी या रोगावर उपाय शोधण्याचा विचार करत असताना, त्यांच्या नजरेस एक गोष्ट पडली. गाईची धार काढणार्‍या स्त्रियांना या रोगाची लागण झाली, तरी त्यांच्यावर या रोगाचा होणारा परिणाम अतिशय कमी असे. या निरीक्षणावर विचार करताना त्यांच्या डोक्यामध्ये अशी कल्पना आली, की गाईंना होणारा देवीचा प्रादुर्भाव आणि त्यांच्या संपर्कातील स्त्रियांना होत नसलेला प्रादुर्भाव यामध्ये काहीतरी रहस्य दडलेले असावे. 


गाईच्या संपर्कात आल्यामुळे स्त्रियांना या रोगापासून बचाव करण्याची क्षमता प्राप्त होत असावी हे अनुमान तपासण्यासाठी त्यांनी एक धाडसी प्रयोग केला. गाईला झालेल्या देवीच्या व्रणातील स्राव त्यांनी एका १८ वर्षांच्या तरुणाच्या शरीरात टोचला. त्याचाच परिणाम असा झाला, की, त्या तरुणाला देवीची लागण झाली नाही. असाच प्रयोग त्यांनी इतर २३ व्यक्तींवर केला. त्यामध्येही त्यांना समाधानकारक यश मिळाले. असे होऊनही संशोधकांनी मात्र त्यांचा शोध मान्य केला नाही. शेवटच्या प्रयोगात त्यांनी या चाचणीमध्ये आपल्या ११ महिन्यांच्या मुलाचा समावेश केला. त्यांनी सातत्याने केलेल्या या प्रयोगामुळे संशोधकांना त्यांची दखल घ्यावी लागली. अखेर त्यांचे अनुमान मान्य होऊन देवीच्या रोगावर प्रतिबंधक लस तयार झाली. इंग्रजीमधील Vaccination हा शब्द Vacca म्हणजे गाय या शब्दापासून तयार झालेला आहे. देवीच्या व्रणातील स्राव शरीरामध्ये टोचल्यामुळे मानवाची प्रतिष्ठा कमी होते, असा आक्षेप घेण्यात आला. मात्र, या रोगामुळे हजारो लोक मृत्युमुखी पडतात, याबाबत मात्र त्यांनी आस्था दाखविली नाही. जेन्नर यांची कल्पकता आणि त्यांची धाडसी वृत्ती यामुळे हे वरदान प्राप्त झाले.

17 मे दिनविशेष - जागतिक दूरसंचार दिन

17 मे दिनविशेष - जागतिक दूरसंचार दिन


टेलिफोनच्या आधी तारेने संदेश दिले जात होते. त्याचा विस्तार करण्यासाठी १७ मे १८६५ ला इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियनची स्थापना झाली. याची सुरुवात १८६५ पासून करण्यात आली असली तरी, १९६९ पासून खऱ्या अर्थाने भारतातही हा दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली. नोव्हेंबर २००६ मध्ये तुर्कीमध्ये झालेल्या एका विशेष कॉन्फरन्समध्ये जागतिक दूरसंचार दिवस, सूचना आणि सामाजिक प्रसारण दिवस एकाच दिवशी साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. दूरसंचार क्रांती ही जगातील सर्वात महत्त्वाची आधुनिक तंत्रज्ञान आणि विकासाची क्रांती मानली जाते. यामुळे जगाची आणि पर्यायाने प्रत्येक मानवाची छबी बदलली गेली आहे, मोबाईलचा स्मार्टनेस आता व्यक्तित्वात प्रकट होतो आहे. आज दूरसंचार क्षेत्रातील स्पर्धेत भारत सर्वात वेगाने आगेकूच करीत आहे. भारताने ४-जी, ५-जी क्रांतीत आपले मानांकन कायम ठेवले असले तरी जपान आणि चीन याही पुढे जाण्याचा प्रयत्न करीत आहेत. १८८१ मध्ये भारत सरकारने ओरिएंटल टेलिफोन कंपनीकडे पहिल्या सरकारचा निर्णय रद्दबदल करीत इंग्लंडच्या ओरिएंटल टेलिफोन कंपनीला कलकत्ता, मुंबई आणि मद्रास येथे टेलिफोन सेवा सुरू करण्याची परवानगी दिली. त्यानुसार २८ जानेवारी १८८२ पासून भारतात मुंबईसह तीन ठिकाणी टेलिफोन एक्सेंज सुरू झाले. जागतिक दूरसंचार क्षेत्राने दिलेली ही सर्वात महत्त्वाची देण होती. मोबाइलच्या आधी सर्वत्र टेलिफोन अर्थात लॅण्डलाइन फोन होते. मोबाइल आल्यानंतरदेखील लॅण्डलाइन अस्तित्वात होतेच. मात्र मागील पाच ते सात वर्षांत मोबाइल क्षेत्रात ऐतिहासिक क्रांती झाली. या मोबाइल्सने टेलिफोनच काय तर इंटरनेट व लॅपटॉपचीदेखील जागा घेतली. यामुळे आता लॅण्डलाइन हळूहळू कमी होत चालले आहेत. 


भारतातील दूरसंचार क्षेत्रातील ग्राहकांच्या संख्येने फेब्रुवारीत १.१८ अब्जांचा आकडा पार केला आहे. पण एके काळी लोकप्रिय असलेल्या लँडलाइन फोनची मागणी मात्र आता प्रचंड प्रमाणात घटली आहे. स्वस्त दरात उपलब्ध होणारे हँडसेट, कंपन्यांमधील वाढती स्पर्धा आणि दूरसंचार सेवेचा स्वस्त दर या तीन प्रमुख कारणांमुळे लँडलाइनला फटका बसला आहे. भारतीय दूरसंचार क्षेत्राने संपूर्ण जगातल्या दूरसंचार क्षेत्रांच्या यादीत दूसरे स्थान प्राप्त केले आहे. तर या यादीतले पहिले स्थान चीन कडे आहे. जगभरात एका तासात दोन कोटींहून अधिक स्मार्ट फोन्सची विक्री होते, भारतात २०१३ मध्ये २० कोटी इंटरनेट ग्राहक होते, तर आज तीच संख्या ५० कोटींहून अधिक झाली आहे.

17 मे दिनविशेष - जागतिक उच्च रक्तदाब दिन

17 मे दिनविशेष - जागतिक उच्च रक्तदाब दिन


दरवर्षी १७ मे हा ‌दिवस 'जागतिक उच्च रक्तदाब दिन' म्हणून पाळला जातो. या आजाराविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी हा दिन पाळला जातो. या दिनाचे बोधवाक्य ‘Know your numbers’ (आपल्या बी.पी. चा आकडा जाणून घ्या) असे आहे. गेल्या काही वर्षांत लोकांमध्ये उच्च रक्तदाबाचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले आहे. सध्या देशातील शहरी भागांत २० ते ४० टक्के आणि ग्रामीण भागातील १२ ते १७ टक्के जनतेला उच्च रक्तदाब आहे. धावपळीची जीवनशैली, कामाचे वाढलेले तास, धूम्रपानाच्या जोडीला मद्यपान आणि आरोग्याला अपायकारक ठरणाऱ्या खाण्याच्या सवयींमुळे अनेक तरुण तरुणी उच्च रक्तदाबाच्या समस्येला बळी पडत आहेत. पण, सर्वात मोठी समस्या म्हणजे आपल्याला उच्च रक्तदाब आहे याची कल्पनाच अनेकांना नसते. रक्तदाबाच्या आजाराला खुले आमंत्रण आहे. मात्र चोरपावलांनी वस्तीला येणे, हा त्याचा गुण असल्याने अनेकांना त्याची खबरच लागत नाही. तो फारसा गाजावाजा न करता हळूच चोरपावलांनी येतो, त्याचे अस्तित्व काही काळ बरेच जणांना जाणवतही नाही; पण नंतर मात्र तो आक्रमक होतो आणि त्याची दखल आपल्याला घ्यावीच लागते. हळूच प्रवेशलेला हा पाहुणा अगदी आयुष्यभरासाठी आपले कायमचेच बस्तान बसवतो.


नेमका कोण आहे हा? ‘हा’ आहे, मुख्यत: चुकीच्या जीवनशैलीमुळे आपला जीवनसाथी होणारा ‘उच्च रक्तदाब’ वा हायपरटेन्शन किंवा शॉर्टकट संबोधन म्हणजे बी.पी. आज भारतात प्रौढांपैकी साधारणत: २३ टक्के लोकांना बीपीचा आजार आहे. याखेरीज अर्थात अनेकांना आपल्याला हा आजार आहे, याचीच कल्पना नसते, हे लक्षात घेतले, तर रुग्णांची टक्केवारी २३ टक्क्यांहून जास्त असण्याचीच शक्यता आहे. 


पूर्वीच्या काळी उतारवयात लोकांना बी.पी. चा त्रास मागे लागायचा. अलीकडे मात्र तरुण वयातच तो गाठतो. ‘आमच्या ओपीडीचा चेहरा तरुण होत चाललाय’ असे गमतीने हृदयरोगतज्ज्ञ म्हणतात. ज्येष्ठ नागरिका बरोबरच तरुण मॅनेजर्स, सीईओचा भरणा आज रक्तदाबाच्या रुग्णांमध्ये आहे. पूर्वी साठीला लागणारी औषधे त्यामुळेच आज तिशीतच गरजेची बनतात. इतकेच काय, पण शालेय मुलांमध्येही रक्तदाब वाढलेला दिसतो, असे काही पाहण्यांमध्ये दिसून आले. पुन्हा श्रीमंत गरीब, शहरी ग्रामीण अशा सर्वच वर्गात हा आजार आता आढळतो. जगभरच अर्थात हा ट्रेंड आहे. आणि ज्या झपाट्याने या रुग्णांची संख्या वाढते आहे, ते बघून हा साथीचा रोग नसतानाही त्याला ‘वैश्विक आधुनिक साथ’ असे संबोधले जाते. 


हृदयाच्या आकुंचन (Systole) व प्रसरणाने (Diastole) रक्तवाहिन्यांमध्ये रक्त वाहते. रक्ताचा वाहिन्यांच्या भिंतींवर जो दाब पडतो, तो म्हणजे रक्तदाब. शरीरातील अनेक रसायने व यंत्रणा हा रक्तदाब नियंत्रित करत असतात. साधारणत: १२०/८० (सिस्टोलिक/डायस्टोलिक) हे बी.पी. नॉर्मल समजले जाते. १४०/९० ही नॉर्मल रक्तदाबाची सीमारेषा. या दरम्यानचा रक्तदाब (१२०-१४० / ८०-९०) ही उच्च रक्तदाब पूर्वस्थिती व १४०/९० च्या वर असला तर उच्च रक्तदाब समजला जातो. अर्थात, असे रिडिंग सातत्याने मिळाले तरच त्याला बी.पी. चा रुग्ण मानले जाते. कधी कधी शारीरिक, मानसिक धावपळीने तात्पुरता रक्तदाब वाढतो व नंतर लगेच नॉर्मललाही येतो. म्हणून डॉक्टर वेगवेगळ्या दिवशी रक्तदाबाची तपासणी करतात. सातत्याने तो वाढलेला दिसला तरच त्याला उच्च रक्तदाबाचा रुग्ण, असे शिक्कामोर्तब केले जाते.


रक्तदाबाचा त्रास मागे लागण्यामागे काय कारणे मुख्यत: आहेत? नेमक्या एका कारणावर बोट ठेवता येत नाही. अनेक वेगवेगळे घटक यास कारणीभूत असतात. वाढते वय, अनुवंशिकता या कारणांखेरीज यास जीवनशैली मुख्यत: कारणीभूत असते. लठ्ठपणा, चुकीचा आहार, यातही सोडियमयुक्त आहार अधिक म्हणजे आहारात मिठाचे प्रमाण अधिक व पोटॅशियमयुक्त आहार कमी म्हणजे फळे व भाज्या कमी, धूम्रपान, दारूचे व्यसन, सुस्त रुटीन, व्यायामाचा अभाव, मानसिक ताणतणाव हे घटक रक्तदाब वाढवण्यास कारण ठरू शकतात.


रक्तदाब वाढू लागला की लक्षणे दिसतीलच असे नाही. म्हणूनच याला चोरपावलाने येणारा आजार ‘सायलेंट किलर’ म्हटले जाते. हे अत्यंत धोक्याचे आहे. कारण लक्षण दिसली नाहीत तर सहसा कोणी डॉक्टरकडे धाव घेत नाही, अशीच आपली कृती असते. त्यामुळे वाढलेला रक्तदाब आपल्या अनेक अवयवांवर नकळत दुष्परिणाम करत जातो. काही जणांमध्ये लक्षण दिसतात. उदा. सूज, थकवा, डोकेदुखी, अस्पष्ट दिसणे, धाप लागणे, उलट्या, चक्कर, बधिरता. पण इतरही अनेक आजारांत ही लक्षणे दिसतात. त्यामुळे हा रक्तदाबाचाच त्रास आहे, असे काही लगेच सुशिक्षित माहीतगारांच्याही लक्षात येत नाही. या वरील चर्चेवरून नियमित वैद्यकीय तपासणी तरुणपणापासूनच (२५-३० वयापासूनच) केल्यास रक्तदाबावर नजर ठेवली जाईल.


समजा रक्तदाब नियंत्रणात नाही राहिला, बराच काळ वाढलेल्या स्थितीत राहिला तर काय गुंतागुंत होते? मेंदूत वा इतर अवयवात रक्तस्राव, हार्ट अटॅक, मूत्रपिंडे निकामी होणे अशा अनेक इमर्जन्सी येतात. पण जर वेळीच रोगनिदान झाले व औषधोपचार नियमित चालू ठेवले, जीवनशैली सुधारली, तर नक्कीच हा आजार आपल्या कह्यात राहतो. उच्च रक्तदाबासाठी विविध प्रकारची, विविध प्रकारे शरीरात काम करणारी औषधे उपलब्ध आहेत. उदा. लोसार-एच, अटेन, टेल्मा, अमलो, नेनिकार्ड इत्यादी. रुग्णाचे वय, रक्तदाबाची तीव्रता, इतर आजार (उदा. मधुमेहही आहे का), किडनी-यकृताची कार्यक्षमता अशा अनेक बाबींचा विचार करून उपचार मार्गदर्शक तत्त्वांनुसार कोणत्या रुग्णाला कोणते औषध द्यायचे, हे डॉक्टर ठरवतात. या गोळ्या रोज नियमितपणे ठरलेल्या वेळी घेणे आवश्यक असते. पण अगदी सुशिक्षिता मध्येही उपचारांत धर-सोड करणारे ४०-५०% रुग्ण आढळतात. 


कंटाळा, विसरणे, ‘सवय’ लागते हा गैरसमज, दुष्परिणामाची विनाकारण भीती, तपासणीत नॉर्मल दिसले तर ‘आता काय बी.पी. नॉर्मल आहे, कशाला घ्यायची गोळी’ असा घातक विचार, मध्येच इतर पॅथीकडे वळणे अशामुळे गोळी सोडली जाते. यथावकाश रक्तदाब नियंत्रणात न राहिल्याने वर उल्लेख केल्याप्रमाणे स्ट्रोक, हार्ट अटॅक अशा इमर्जन्सी येतात व थेट ‘आयसीयू’त धाव घ्यावी लागते. हे सर्व नियमित औषधे घेतल्याने टळू शकते, पण तरी अनेक रुग्णांची ‘बंडखोरी’ ही आपत्ती ओढवून घेत असते. रक्तदाबाची औषधे बहुतांशी रुग्णांना आयुष्यभर घ्यावीच लागतात. कोणतेही औषध म्हटले की साइड इफेक्ट्स असू शकतात. कोरडा खोकला, घोट्यावर सूज, थकवा, पोटॅशिअमचे रक्तातील प्रमाण कमी जास्त होणे वगैरे दुष्परिणाम काही रुग्णांमध्ये दिसू शकतात. झोपण्याच्या स्थितीतून झटकन उभे राहायला गेले, तर तोल जाऊ शकतो. हे विशेषत: वृद्ध रुग्णांमध्ये दिसते. गोळ्या चालू करताना अपेक्षित काही दुष्परिणाम आहेत का, याविषयी डॉक्टरांना जरूर विचारावे व नंतर काही त्रास वाटल्यास स्वमनाने गोळी बंद न करता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.


रुग्णांना रक्तदाबाखेरीज इतर काही आजार असतील, तर त्यांना अनेक औषधे घ्यावी लागतात. यापैकी काही औषधांचा रक्तदाबावर परिणाम होऊ शकतो. उदा. काही वेदनाशामकांच्या सतत सेवनाने, सर्दी खोकल्याच्या काही औषधांनी, स्टिरॉईड्समुळे, गर्भनिरोधक गोळ्या यामुळे रक्तदाब वाढू शकतो व त्यामुळे रक्तदाबाच्या गोळ्यांचा परिणामही कमी होऊ शकतो. मधुमेह व अस्थमाच्या औषधांचेही रक्तदाबाच्या औषधांशी पटत नाही. म्हणून आपण घेत असलेल्या सर्व औषधांचे एकमेकांत पटावे, त्यांच्यात आंतरक्रिया (interactions) होऊन काही दुष्परिणाम होऊ नयेत, यासाठी आपल्या प्रत्येक डॉक्टरांना इतर डॉक्टरांनी दिलेली सर्व औषधे सांगणे वा दाखवणे गरजेचे आहे. त्यानुसार डॉक्टर्स औषधयोजना करतील. अ‍ॅसिडिटीसाठी अनेक रुग्ण स्वमनाने वारंवार अँटासिड्स वापरतात. अनेक अँटासिड्स मध्ये सोडियम असते. त्यामुळे ती कधीतरी घेणे ठीक; पण वारंवार योग्य नाही. अ‍ॅसिडीटी, सर्दी खोकला यासाठी मी स्वमनाने कोणती औषधे घेऊ शकतो, हे डॉक्टरांना विचारून ठेवावे.

दिनविशेष :- 16 जून - वर्ल्ड रिफिल डे

दिनविशेष :- 16 जून - वर्ल्ड रिफिल डे संपूर्ण वर्षभराचे दिनविशेष पहा. Click Here टिकाऊ पर्यायांचा अवलंब केल्याने कचरा कमी होतो, संसाधनांचे सं...