Showing posts with label 13june. Show all posts
Showing posts with label 13june. Show all posts

Sunday, 11 May 2025

दिनविशेष :- 13 जून - नानक भील आदिवासी क्रांतिकारक

दिनविशेष :- 13 जून - नानक भील आदिवासी क्रांतिकारक 


संपूर्ण वर्षभराचे दिनविशेष पहा. Click Here

नानक भील अंग्रेज़ों का विरोध करने वाले क्रांतिकारी विचारों के व्यक्ति थे। 13 जून, 1922 को एक किसान सभा के दौरान अंग्रेज़ों ने उन्हें गोली मार दी। उनकी शहादत के बाद अंग्रेज़ों की शासन व्यवस्था में कुछ परिवर्तन आया और किसानों और आम जनता को राहत मिली और उनमें एक नवजागृति पनपी। अमर शहीद नानक भील की स्मृति में मूर्तियां स्थापित की गई और मेले का आयोजन होता है।                                                               

♨️ नानक भील शहादत

              13 जून, 1922 में डाबी गांव में किसानों की बैठक रखी गई थी। वहीं पर अचानक से अंग्रेज़ पुलिस ने आकर फायरिंग कर दी। इस गोलाबारी से आम किसानों में भगदड़ मच गई, लेकिन नानक भील ने झंडा लहराते हुए अंग्रेज़ों का विरोध किया और झंडा गीत गाते हुए विरोध करते रहे। इसी दौरान वहां पुलिस ने नानक भील को सीने पर गोली मारी और इस प्रकार भारत का एक वीर सपूत शहीद हो गया; लेकिन नानक भील की शहादत व्यर्थ नहीं गई। उनके इस महत्वपूर्ण कदम से अंग्रेज़ों की शासन व्यवस्था में कुछ परिवर्तन आया और किसानों और आम जनता को राहत मिली और उनमें एक नवजागृति पनपी। आम लोगों ने खुद के लिए लड़ना शुरू किया।


💁🏻‍♂️नानक भील परिचय

              अमर शहीद नानक भील का जन्म 1890 ई. में बराड़ के धनेश्वर गांव में हुआ था। इनके पिता का नाम भेरू था। यह बचपन से ही बहादुर निडर साहसी और एक जागरुक व्यक्ति रहे। नानक भील गोविंद गुरु और मोतीलाल तेजावत द्वारा चलाए जा रहे आंदोलन से काफी प्रभावित थे। उन्होंने अपने क्षेत्र में आम किसानों, जनता को अपने अधिकारों और अंग्रेज़ों से स्वतंत्रता के लिए जागरूकता किया।


🙅🏻‍♂️ नानक भील - अंग्रेज़ों के विरोधी

             नानक भील ने अपने क्षेत्र में झंडा गीतों के माध्यम से अंग्रेज़ों का विरोध किया और अपने क्षेत्र के आम लोगों को अंग्रेज़ों के खिलाफ विरोध करने के लिए प्रेरित किया। यह अपने झंडा गीतों के माध्यम से लोगों में एक नया उत्साह भर देते थे।

                                                                                                   

  🇮🇳 *जयहिंद* 🇮🇳

🌹 *विनम्र अभिवादन* 🌹

    स्त्रोत ~ WikipediA

दिनविशेष :- 13 जून - गणेश दामोदर सावरकर जन्मदिन (मराठी क्रांतिकारक)

दिनविशेष :- 13 जून - गणेश दामोदर सावरकर जन्मदिन (मराठी क्रांतिकारक)

जन्म : १३ जून १८७९ (भगूर, नाशिक जिल्हा, महाराष्ट्र, भारत)

मृत्यू : १६ मार्च १९४५ (भारत)


संपूर्ण वर्षभराचे दिनविशेष पहा. Click Here

चळवळ : भारतीय स्वातंत्र्यलढा

संघटना : अभिनव भारत, मित्रमेळा

धर्म : हिंदू

प्रभाव : शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक

वडील : दामोदर सावरकर

आई : राधाबाई सावरकर

पत्नी : यशोदा उर्फ येसूताई

अपत्ये : नाहीत.

टोपणनाव : बाबाराव

गणेश दामोदर सावरकर उर्फ बाबाराव सावरकर (जून १३, १८७९, मार्च १६, १९४५) हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्त्व होते.

    

सावरकर घराणे मूळचे महाराष्ट्र राज्याच्या रत्‍नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात असलेल्या गुहागर पेट्यामधील पालशेत येथील होते. त्या परिसरातील सांवरीच्या झाडांवरून काही जणांना सांवरवाडीकर म्हणून ओळखले जाऊ लागले. कालांतराने सांवरवाडीकर चे सावरकर झाले. पुढे कामानिमित्त काही मंडळी कोकण सोडून घाटावर स्थाईक झाली. बाळाजी बाजीराव पेशवे यांच्या काळात केलेल्या पराक्रमामुळे पेशव्यांनी नारायण दीक्षित (सावरकर) आणि त्यांचे स्नेही धोपावकर यांना नाशिक जिल्ह्यातील भगूर गावाच्या जवळ असलेल्या राहुरी गावाची जहागीर दिली. घाटावर स्थाईक झालेल्या सावरकर घराण्यातील नारायण दीक्षित (सावरकर) यांच्यापासून दामोदरपंत सावरकर हे सातव्या पिढीतील वंशज होते. दामोदरपंतांचे शिक्षण मॅट्रिकपर्यंत झाले होते. भगूर परिसरात त्यांच्या इतके शिकलेले अन्य कोणीही नसल्याने त्यांना विशेष मान होता. पिढीजात जहागीर सांभाळणे आणि सावकारी हे त्यांचे व्यवसाय होते.


दामोदरपंत सावरकर यांचा विवाह मनोहर घराण्यातील राधाबाई यांच्याशी झाला. लग्नानंतर त्यांना दोन मुले झाली पण ती वाचली नाहीत. त्यानंतर या जोडप्याला तीन मुले व एक मुलगी अशी चार अपत्ये झाली. दि. १३-जून-१८७९ रोजी गणेश दामोदर सावरकर उर्फ बाबा यांचा जन्म झाला, दि. २८-मे-१८८३ रोजी विनायक उर्फ तात्या आणि नंतर साधारण तीन तीन वर्षांनी माई (नंतरच्या माई काळे) आणि नारायण उर्फ बाळ सावरकर यांचा जन्म झाला.


💁🏻‍♂️ बालपण

            बाबारावांचे बालपण भगूर गावात गेले. लहानपणापासून बाबाराव हुशार, अभ्यासू, संघटनकुशल, सततोद्योगी होते. तसेच बुद्धिबळ, आट्यापाट्या, विटी-दांडू, धनुष्य-बाण चालविणे वगैरे विविध खेळातही ते पटाईत होते. लहानपणी बाबांना विविध प्रकारच्या रोगांनी सताविले. त्यात २०-२१ दिवस मुदतीचा ताप (विषमज्वर) हा नित्याचाच असे आणि बाबांना विंचू दंशही खूपदा (सुमारे २०० वेळा) झाला. थोडे मोठे झाल्यावर वडील दामोदरपंतांच्या देखरेखीखाली बाबाराव तलवार आणि बंदूकही उत्तम प्रकारे चालवायला शिकले. वडील, मामा आणि तात्याराव कविता करीत असत पण बाबांना कवितेची आवड नव्हती. वडिलांना आवड असल्याने त्यांनी घरी गाय-बैल, कुत्रा पाळलेले होते. तसेच घरी फुलझाडेही खूप लावली होती. बाबारावांनी वडिलांकडून टापटीप, अभ्यास, सगळ्यांशी मिळून राहणे, हे गुण घेतले. तर आईकडून स्वयंपाक करायला ते शिकले. आईच्या अकाली निधनानंतर बाबाराव काही काळ आपल्या घरी स्वतःच स्वयंपाक करीत असत.


📖🖊️ शिक्षण / व्यासंग

              घरच्या परिस्थितीमुळे आणि कुटुंबाच्या जबाबदारीमुळे बाबारावांचे शालेय शिक्षण मॅट्रिकच्या आतच उरकले पण योगविद्या, वैद्यकाचा नाद असल्याने त्या अनुषंगाने त्यांनी अनेक पुस्तकांचे वाचन केले. ते स्वतः अनेक प्रकारची औषधेही तयार करीत असत. फलज्योतिष्य, शरीर सामुद्रिक, हस्त सामुद्रिक, मंत्रशास्त्र, योग, वेदान्त अशा शास्त्रांचा सखोल अभ्यास त्यांनी केला. ते स्वतः चांगले गात असत तसेच तबला आणि सतार वाजवू शकत असत. त्यांच्या संग्रहात इतिहास, राजकारण, राज्यशासन, भाषा, सैन्यव्यवहार, धर्म, तत्त्वज्ञान, चरित्रे, संघटनशास्त्र, कला, इ. अनेक विषयांची हजारो पुस्तके होती, त्यांचा सखोल अभ्यास बाबारावांनी केला होता.


       ✍️ लेखन ✍️

राष्ट्रमीमांसा व हिंदुस्थानचे राष्ट्रस्वरूप, दुर्गातनय या टोपणनावाने काशी येथे लिहिले, १९३४ साली प्रकाशन.

हिंदुराष्ट्र - पूर्वी-आता-पुढे

शिवरायांची आग्र्‍यावरील गरुडझेप

वीरा-रत्‍न-मंजुषा

ख्रिस्तपरिचय अर्थात ख्रिस्ताचे हिंदुत्व

धर्म कशाला हवा ?

मोपल्यांचे बंड

वीर बैरागी, मूळ हिंदी भाषेतील पुस्तकावरून भाषांतरित केलेले पुस्तक

पत्रलेखन

१८५७चा स्वतंत्र्यसंग्राम


प्रकाशन

नेपाळी आंदोलनाचा उपक्रम

संघटन संजीवनी

भयसूचक घंटा


✍️ स्फुट लेख

केसरी (पुणे), लोकमान्य (मुंबई), महाराष्ट्र (नागपूर), सकाळ (मुंबई), आदेश (नागपूर), वंदे भारतम्‌ (मुंबई), मराठा (इंग्रजी, पुणे), श्रद्धानंद (पुणे), प्रजापक्ष (अकोला), विक्रम (सांगली) इ. वृत्तपत्रात बाबारावांनी वेळोवेळी, विविध विषयांवर लेख लिहिले.


🚹📒 बाबाराव सावरकरांचे गाजलेले पुस्तक - ख्रिस्त परिचय अर्थात ख्रिस्ताचे हिंदुत्व

           ‘येशू ख्रिस्त हे तामिळी हिंदू होते. तसेच ते जन्माने विश्‍वकर्मा ब्राह्मण होते. ख्रिश्‍चन धर्म हा हिंदू धर्माचाच एक भाग आहे‘, असे विचार स्वातंत्र्यवीर विनायक दामोर सावरकर यांचे बंधू गणेश दामोदर (बाबाराव) सावरकर यांनी "ख्रिस्त परिचय‘ नावाच्या १९४६ साली प्रकाशित झालेल्या एका पुस्तकात मांडले होते. हे पुस्तक २६-२-२०१६ रोजी पुन:प्रकाशित करण्यात आले. ‘ओल इंडिया ट्रू ख्रिश्चन काउ या संस्थेने या पुस्तकाविरुद्ध मुंबई हायकोर्टात धाव घेऊन पुस्तकाची प्रत्येक प्रत जप्त करण्याची मागणी केली आहे.


येशू यांच्याबद्दल या पुस्तकात दिलेली माहिती -


येशू ख्रिस्त हे तमिळ हिंदू होते.

त्यांचे खरे नाव केशवराव कृष्ण असे होते.

तमिळ ही त्यांची मातृभाषा होती.

येशू हे कृष्णवर्णीय होते. त्यांनी योगविद्येचे प्रशिक्षण घेतले होते.

येशू यांचे कुटुंबीय भारतीय वेशभूषा वापरत होते.

येशू ४९ वर्षांचे असताना त्यांनी देह त्यागण्याचा निर्णय घेतला.

येशू योगावस्थेत गेले आणि त्यांनी समाधी घेतली.

ख्रिस्ती धर्म हा हिंदू धर्मातील एक पंथ होता.

👫🏻 लग्न

        आईच्या अकाली निधनानंतर १८९६ साली बाबारावांचे लग्न झाले. लग्नानंतर त्यांनी पत्‍नीचे नाव यशोदा ठेवले. तात्यारावांसह अनेकजण त्यांना येसू वहिनी म्हणत. येसूवहिनी तात्यारावांच्या आणि नारायणरावांच्या प्रेरणास्थान होत्या. बाबारावांना दोन मुले झाली पण दोघेही फार काळ राहू शकली नाही.


💥 क्रांतिकार्य

            तात्याराव आणि मित्रांनी १८९९ च्या नोव्हेंबर महिन्यात राष्ट्रभक्तसमूह नावाची एक गुप्त संस्था स्थापन केली. सुरुवातीला बाबारावांना या संस्थेबद्दल काहीच माहिती नव्हती. मात्र नंतर त्यांना माहिती मिळाल्यावर बाबांनी या संस्थेसाठी काम सुरू केले. गुप्त संस्थेत तरुणांना प्रवेश देण्यापूर्वी त्यांची मानसिक तयारी पाहण्यासाठी दि. १-जानेवारी-१९०० या दिवशी मित्रमेळा नावाची संस्था उघडपणे सुरू करण्यात आली. बाबाराव मित्रमेळा संस्थेचे कार्यवाह होते. मित्रमेळा संस्थेतर्फे गणेश उत्सव, शिवजयंतीसह इतर थोरांच्या जयंत्या साजर्‍या करणे, सार्वजनिक (प्रकट) भाषणांचे आयोजन करणे, कविता, पोवाडे म्हणणे आदी प्रकारे तरुणांना प्रोत्साहन देण्याचे काम हाती घेण्यात आले. बाबारावांनी संस्थेतील तरुणांना मार्गदर्शन मिळावे म्हणून लोकमान्य टिळकांसह अनेकांना वेळोवेळी नाशिक येथे आमंत्रण दिले.


बाबांच्या प्रयत्‍नांनी राष्ट्रीय चळवळीचे केंद्र म्हणून नाशिक ओळखले जाऊ लागले. १९०४ साली मित्रमेळाची गुप्त संस्था म्हणून अभिनव भारत संस्था स्थापन करण्यातही बाबांचा पुढाकार होता. अभिनव भारत ही जहालवाद्यांची संस्था होती. त्यातील लोकांचा पूर्ण स्वातंत्र्य हाच ध्यास होता आणि त्यासाठी काहीही करण्याची तयारी असलेल्या तरुणांनाच त्यात प्रवेश दिला जात असे. या दोन संस्थांशिवाय बाबारावांच्या पुढाकारानेच १९०३ साली मित्रसमाज नावाची विद्यार्थ्यांची संस्था आणि १९०५ साली आत्मनिष्ठ युवतीसंघ नावाची स्त्रियांची संघटना स्थापन करण्यात आली. या सर्व संस्था आपापल्या कार्यक्षेत्रात स्वदेशीचा पुरस्कार करणार्‍या होत्या आणि यातील निवडक मंडळींना अभिनव भारतशी जोडले जात असे.


२०-जुलै-१९०५ रोजी वंगभंगची अधिकृत घोषणा झाली. त्यानंतर याचा विरोध म्हणून सर्वत्र विदेशीचा बहिष्कार - होळी, स्वदेशीचा पुरस्कार सुरू झाला. बाबाराव नाशिक येथून आणि तात्याराव पुणे येथून ही चळवळ चालवीत. सशस्त्र क्रांतीचा प्रचारही गुप्तपणे सुरू करण्यात आला.


⚖️ अभियोग

        सरकारी यंत्रणा बाबारावांच्या पाळतीवर होतीच. त्यातच बाबाराव मुंबईला गेले आणि क्षुल्लक वादात सापडले. त्यावरून चौकशी करून बाबांना दि. २८-फेब्रुवारी-१९०९ रोजी मुंबईत अटक करण्यात आली. नंतर त्यांना नाशिकला नेण्यात आले. सखोल चौकशीअंती बाबांच्या घरी आक्षेपार्ह बर्‍याच गोष्टी आढळल्याने त्यांच्यावर तत्कालीन दंडविधानाच्या कलम १२१ आणि १२४ अ अंतर्गत खटला दाखल करण्यात आला. दि.०८ जून इ.स. १९०९ रोजी बाबारावांना जन्मठेपेची - काळ्यापाण्याची शिक्षा आणि सर्व मिळकतीच्या जप्तीची शिक्षा तसेच सश्रम कारावासाची शिक्षा ठोठाविण्यात आली. काळ्यापाण्याची शिक्षा अंदमान येथे भोगावयाची होती. ही शिक्षा सुनाविल्यावर थोड्याच काळात बाबारावांनी उच्च न्यायालयात फेर निर्णयासाठी याचिका दाखल केली. पण यथावकाश त्याचाही निकाल बाबांच्या विरुद्धच लागला आणि जुनी शिक्षा कायम करण्यात आली.


🌀 परिणाम

               बाबारावांना जन्मठेपेची शिक्षा झाल्याचे लंडन मध्ये असलेल्या भारतीयांना समजले. तात्याराव आणि सहकारी ब्रिटिश सरकारला कशी अद्दल घडवावी यावर विचार करीत होते. तोच एकीकडे मदनलाल धिंग्रा याने वंगभंगसाठी जबाबदार असलेल्या कर्झन वायलीवर दि. ०१ जुलै इ.स. १९०९ रोजी गोळ्या झाडून त्याचा वध केला. तर दुसरीकडे नाशिकमधील अभिनव भारतचे सदस्य गुप्तपणे एकत्र आले आणि अनंत कान्हेरे, अण्णा कर्वे आणि विनायक देशपांडे यांनी बाबारावांना शिक्षा होण्यास जबाबदार असलेला मुख्य अधिकारी म्हणून जॅक्सनचा वध दि. २१ डिसेंबर इ.स. १९०९ रोजी केला. याशिवाय देशभर हरेक मार्गाने निषेध झाले.


⛓️ अंदमान - काळ्या पाण्याची शिक्षा                                                         काळ्या पाण्याची शिक्षा भोगण्यासाठी इ.स. १९११ साली अंदमानला पाठविण्यात आले. अंदमान येथील शिक्षा अतिशय कठोर स्वरूपाची होती. बाबाराव रोज मरण यातना भोगत. त्यातच तात्यारावांनाही काळ्या पाण्याची शिक्षा झाली आणि त्यांचीही रवानगी अंदमानला करण्यात आली. बाबारावांचे धाकटे बंधू नारायणराव यांनी आपल्या दोन्ही वडील बंधूंची सुटका व्हावी म्हणून अनेकांना भेटून, निवेदने देऊन प्रयत्‍न चालविले. अखेर इ.स. १९२१ साली दोन्ही सावरकर बंधूंची अंदमान मधून सुटका झाली पण एकूण शिक्षेचा काळ संपला नसल्याने त्यांना भारतातील विविध ठिकाणच्या तुरुंगात पाठविण्यात आले. बाबारावांची तब्येत साथ देत नाही असे पाहून इ.स. १९२२ साली त्यांची शिक्षा संपल्याचे घाईने कळविण्यात आले.


🪔 निधन

           शिक्षा संपल्यानंतर बाबांची प्रकृती साथ देत नसतांनाही त्यांनी आपले पूर्वीचे कार्य नव्या जोमाने सुरू केले. त्यांचे लिखाण, वाचन, प्रकाशनाचे कामही वाढले. अनेक तरुणांना प्रोत्साहन देऊन सशस्त्र क्रांतीशिवाय पर्याय नसल्याचे त्यांना पटवून दिले. क्रांतिकार्य अव्याहतपणे सुरू असतांनाच दि. १६-मार्च-१९४५ रोजी बाबाराव सावरकर यांचे निधन झाले.


🏛️ *स्मारक*

               सांगली शहरातील एका इमारतीत बाबाराव सावरकर यांचे एक स्मारक होते. त्या स्मारकात काही दुर्मिळ ग्रंथ, पुस्तके, पत्रव्यवहार, छायाचित्रे अशी संपदा होत्यी. काही अज्ञात व्यक्तींनी हे स्मारक जाळून टाकले. (११ जून २०१४).


📚 *बाबाराव सावरकरांसंबंधी पुस्तके*

क्रांतिकारक बाबाराव सावरकर (लेखक दुर्गेश परुळकर)

क्रांतिवीर बाबाराव सावरकर, लेखक द. न. गोखले

त्या तिघी (सावरकर बंधूंच्या पत्‍नी येसूवहिनी (बाई), यमुना(माई) आणि शांता(ताई) यांच्यावरील कादंबरी (लेखिका डॉ. शुभा साठे)                                                                                                


          🇮🇳 *जयहिंद* 🇮🇳

🙏🌹 *विनम्र अभिवादन* 🌹🙏

दिनविशेष :- 13 जून - शास्त्रज्ञ जेम्स क्लार्क मॅक्सवेल जन्मदिन

दिनविशेष :- 13 जून - शास्त्रज्ञ जेम्स क्लार्क मॅक्सवेल जन्मदिन


जन्म - १३ जून १८३१ (इडिनबुर्ग)

स्मृती - ५ नोव्हेंबर १८७९ (केम्ब्रिज)



संपूर्ण वर्षभराचे दिनविशेष पहा. Click Here

क्लासिकल फिजिक्सची धुरा सांभाळणारा न्यूटन नंतरचा अत्यंत बुद्धीमान शास्त्रज्ञ जेम्स क्लार्क मॅक्सवेल. १९व्या शतकाच्या मध्यावर मॅक्सवेलनं वीज, चुंबकत्व आणि त्यांच्यातील संबंध दाखवणारी समीकरणे लिहिली आणि भौतिकशास्त्रात क्रांती झाली. लहानपणापासूनच मॅक्सवेल स्वतःच अनेक थियरीज काढायचा. त्यामधे त्याची 'झोपेची थियरी' सुध्दा होती. त्यानुसार तो स्वतः संध्याकाळी ५ ते ९:३० पर्यंत झोपायचा, त्यानंतर पहाटे २ वाजेपर्यंत वाचायचा. रात्रीच २ ते २:३० अशा वेळेत त्याच्या घराचा जिना वरखाली चढून व्यायाम करायचा. मग पुनः २:३० ते सकाळी ७ वाजेपर्यंत हे महाशय झोपायचे. शेजार्‍यांना मॅक्सवेलचा रात्रीचा पराक्रम माहितही नसायचा. पण काही वेळा त्याच्या व्यायामाच्या थियरीमुळे होणार्‍या आवाजाने लोक वैतागायला लागले. व्यायाम करत असताना बाजूच्या घरातून जेव्हा बूट,चपला पडू लागल्या तेव्हा मॅक्सवेलने त्याची ही थियरी मागे घेतली. १८५६ साली स्कॉटलंड मधल्या अबेदिनच्या मॅरिस्कल कॉलेजातल्या तत्वज्ञानाशी संबंधित असलेल्या मानाच्या संघटनेचं सदस्यत्व मिळालं. तिथे १८५९ साली त्यानं शनी ग्रहाच्या भोवती असलेल्या गोल वर्तुळांविषयी फारशी माहिती उपलब्ध नसताना एक प्रबंध लिहिला. त्याच्यानंतर १०० वर्षांनी मॅक्सवेलचं या बाबतीतलं म्हणणं खरं ठरल होतं. १८६० साली मॅक्सवेल देवीच्या रोगाच्या हल्ल्यातून दगावता दगावता कसाबसा बचावला. मॅक्सवेलची विद्युतचुंबकीय क्षेत्रावरील समीकरणे म्हणजे त्याच्या बुद्धीमत्तेचा कळस होता. त्यावरून त्याने मांडले की विद्युतचुंबकीय लहरींचा वेग हा कायम एकच असतो. जेव्हा गणिताने त्याने तो मोजला तेव्हा त्याला तो प्रकाशाच्या वेगाइतका आढळला. त्यामुळे मॅक्सवेलला या विद्युतचुंबकीय लहरी आणि प्रकाश यांचा काहितरी संबंध आहे असे वाटू लागले होते. यावरून त्यानं एक अत्यंत महत्वाचा निष्कर्ष काढला तो म्हणजे,"या इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहरी म्हणजेच प्रकाश आहे. फ़क्त प्रकाश स्वरूपातील लहरींचा आपल्या डोळ्यावरील रेटीनावर परीणाम झाल्याने त्यांची आपल्याला जाणीव होते इतकेच. पण इतर फ़्रेक्वेन्सीजच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहरींचा डोळ्यांवर परिणाम होत नाही म्हणून त्या आपल्याला दिसू शकत नाहीत पण त्या लहरी अस्तित्वात असतात" हाच त्याचा महत्वाचा सिद्धांत. प्रत्यक्षात मॅक्सवेलनं कधीच इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहरी शोधायचा किंवा तयार करायचा प्रयत्न केला नाही किंवा याविषयी तो कुणाजवळ बोलला असावा असंही वाटत नाही. मॅक्सवेलनं यासाठी विविध समीकरणं मांडली. त्यांना मॅक्सवेलची समीकरणे म्हणतात. मॅक्सवेलची इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहरींशी संबंधित मूळची वीस समीकरणं होती. त्यांचं नंतर सुलभीकरण करून ऑलिव्हर हेवीसाईडनं (१८५०-१९२५) फक्त चार समीकरणा मध्ये रुपांतर केलं. ही समीकरणे इतकी लोकप्रिय झाली की लोक ती समीकरणे टी शर्टवर घालून मिरवायला लागले. ती समीकरणे त्यांना समजत नव्हती हा भाग वेगळा पण त्या समीकरणांनी लोकांवर एक वेगळीच जादू त्याकाळी केली होती. मॅक्सवेल श्रीमंत होता. कॉलेज मधे असताना तो एका तरूणीच्या प्रेमात पडला होता, पण ती त्याची कझीन असल्याने त्याकाळच्या 'घराण्यातच लग्न केलं तर होणारी मुलं विचित्र असु शकतात' अशा समजुतीनं मॅक्सवेलचा 'प्रेमाचा प्रयोग' मात्र फ़सला होता. त्यानंतर १८५८ मधे त्याचं कॅथरीन नावाच्या मुलीशी लग्न झालं. मॅक्सवेल प्रोफेसर सुद्धा होता पण तो त्याच्या विद्यार्थ्यांना कधीच चांगला शिक्षक वाटला नाही. त्याचे वर्गातील प्रयोग अनेकदा चुकत. शिकवताना सुद्धा त्याची बुद्धी त्याच्या हातापेक्षा जास्त वेगाने चालत असल्याने जे फ़ळ्यावर लिहायचा त्यापेक्षा त्याचे डोके बरेच पुढे गेलेले असल्याने अचानक कधीतरी काहितरी पुटपुटायचा आणि अचानक काहितरी वेगळेच समीकरण मांडायचा, त्यामुळे विद्यार्थ्यांना त्याने शिकवलेले काही कळायचे नाही. मॅक्सवेलने विस्तृत तरंगलांबीच्या विद्युत्चुंबकीय लहरींचे अस्तित्त्व गणिताने सिद्ध केलें होते. परंतु त्यानें गणितानें मांडलेली उपपत्ती प्रयोगानें सिद्ध व्हायच्या अगोदरच सन १८७९ मध्ये तो मरण पावला. तो अगदी लहान असताना त्याची आई वयाच्या ४८व्या वर्षी पोटाच्या कॅन्सरने भुलेविना झालेल्या अयशस्वी शस्त्रक्रियेमुळे दगावली. त्याच्या आईला होणार्‍या वेदना मॅक्सवेलने पाहिल्या होत्या, त्यामुळे जेव्हा त्याची आई वारली तेव्हा तो म्हणाला, "हे आता बरं झालं, निदान तिला यापुढे वेदना तरी होणार नाहीत." पण योगायोग म्हणजे मॅक्सवेल सुद्धा त्याच्या आई प्रमाणेच पोटाच्याच कॅन्सरने १८७९ साली मरण पावला आणि त्याचेही वय त्याच्या आई इतकेच ४८ वर्षांचेच होते.

दिनविशेष :- 13 जून - आचार्य प्रल्हाद केशव अत्रे स्मृतिदिन

दिनविशेष :- 13 जून - आचार्य प्रल्हाद केशव अत्रे स्मृतिदिन

जन्म - १३ ऑगस्ट १८९८ (पुरंदर,पुणे)

स्मृती - १३ जून १९६९ (मुंबई)


संपूर्ण वर्षभराचे दिनविशेष पहा. Click Here

मराठीतील नावाजलेले लेखक, कवी, नाटककार, संपादक, पत्रकार, चित्रपट निर्माते, शिक्षणतज्ज्ञ, राजकारणी व वक्ते आचार्य प्रल्हाद केशव अत्रे. १९३४ साली सरस्वती सिनेटोनच्या दादा तोरण्यांच्या आग्रहाखातर नारद-नारदी चित्रपटाची कथा व संवाद अत्र्यांनी लिहून दिले. 'हंस पिक्स्चर्स' साठी १९३७ साली त्यांनी इब्सेनच्या 'पिलर ऑफ द सोसायटी' या कथेवरून धर्मवीर, स्वतःच्याच कथांवरून प्रेमवीर ह्या मराठी व 'बेगुनाह' या हिंदी चित्रपटांच्या पटकथा लिहून दिल्या. १९३८ साली 'हंस' साठीच 'ब्रह्मचारी' चित्रपटाची कथा त्यांनी लिहून दिली. त्यांनी लिहिलेला 'ब्रँडीची बाटली' हा चित्रपटही लोकप्रिय ठरला. अत्र्यांनी राजगुरू व अभ्यंकर या इतर दोन भागीदारांसोबत एआरए या नावाने 'नवयुग चित्रपट कंपनी' काढली. पुढे 'हंस पिक्चर्स' मधले मास्टर विनायक, पांडुरंग नाईक, बाबूराव पेंढारकर हे देखील भागीदार झाल्यावर या कंपनीने ’नवयुग पिक्चर्स’ असे नाव बदलून घेतले. १९४० साली नवयुग पिक्चर्स तर्फे 'लपंडाव' चित्रपटाची कथा अत्र्यांनी लिहिली. 'लपंडाव' चित्रपटानंतर त्यांनी 'संत सखू' या चित्रपटाचे संवाद लिहिले. परंतु 'प्रभात'ने ही हाच विषय घेतला आहे या कारणाने मास्टर विनायकांनी त्याला विरोध केला. नवयुग पिक्चर्सने मग वि.स. खांडेकरांची 'अमृत' ही कथा घेऊन चित्रपट काढावयाचे ठरवले. या वादामुळे अत्र्यांनी नवयुग पिक्चर्स सोडले. अत्र्यांनी दिग्दर्शित केलेल्या 'श्यामची आई' चित्रपटाला १९५४ साली सुरू झालेल्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहोळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे पहिले 'सुवर्ण कमळ' मिळाले होते. १९२३ साली अत्र्यांनी 'अध्यापन' मासिक सुरू केले. १९२६ मध्ये 'रत्नाकर', १९२९ साली 'मनोरमा' आणि पुढे १९३५ साली 'नवे अध्यापन' व १९३९ साली 'इलाखा शिक्षक' ही मासिके काढली. १९४० साली त्यांनी 'नवयुग' साप्ताहिक सुरू केले. १९५६ साली त्यांनी 'मराठा' हे दैनिक सुरू केले. ते त्यांच्या हयाती नंतरही काही काळ प्रकाशित होत होते. समाजातील दुर्बल घटक, गोरगरीब, तळागाळातील माणसे, अज्ञजन, उपेक्षित, दलित यांचा आपल्या सामर्थ्यानिशी अत्र्यांनी सतत कैवार घेतला. आचार्य अत्रे हे महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी उभ्या राहिलेल्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील प्रमुख नेते होते.

दिनविशेष :- 16 जून - वर्ल्ड रिफिल डे

दिनविशेष :- 16 जून - वर्ल्ड रिफिल डे संपूर्ण वर्षभराचे दिनविशेष पहा. Click Here टिकाऊ पर्यायांचा अवलंब केल्याने कचरा कमी होतो, संसाधनांचे सं...