दिनविशेष :- 14 जून - शास्त्रज्ञ चार्ल्स कुलोम जन्मदिन
जन्म - १४ जून १७३६ (फ्रांस)
स्मृती - २३ ऑगस्ट १८०६ (पॅरिस,फ्रांस)
संपूर्ण वर्षभराचे दिनविशेष पहा. Click Here
संदर्भ : इंटरनेट
शैक्षणिक बातम्या, परिपाठ, गोष्टी, दिनविशेष, सुविचार, मूल्यशिक्षण, व्यक्तिमत्त्व विशेष, Parenting tips, विनोद,
संदर्भ : इंटरनेट
पुण्यातील भारत सेवक समाजाचा (The Servants of Indian Society) आज स्थापना दिन. स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेल्या अनेक सेवाभावी, देशभक्त संस्था मध्ये ‘भारत सेवक समाज’ चे स्थान वैशिष्ट्यपूर्ण आहे. भारताच्या सेवेसाठी तरुण, त्यागी, निष्ठावान कार्यकर्ते घडवण्याच्या उद्देशाने विसाव्या शतकाच्या प्रारंभी म्हणजेच १२ जून १९०५ रोजी गोपाळ कृष्ण गोखले यांनी आपल्या काही जीवनव्रती मित्रांच्या सहकार्याने भारत सेवक समाजाची स्थापना केली. गोखले यांनी स्थापन केलेली ही संस्था संख्यात्मक अंगाने विचार केला तर कधीच खूप मोठी झाली नाही आणि तरीही ती दखलपात्र ठरली. कारण तिच्या सदस्यांनी केलेल्या कार्याची गुणवत्ता. स्वातंत्र्योत्तर काळात सरकारने याच नावाची दुसरी संस्था पुरस्कृत केल्यामुळे संस्थेने आपले नाव बदलले आणि ‘हिंद सेवक समाज’ असे नवे नाव सरकार दरबारी नोंदवले. जनसामान्यांच्या मनात मात्र ‘भारत सेवक समाज’ या जुन्या नावानेच ही संस्था आपला आब राखून आहे. भारत सेवक समाजाची सुरुवात करण्यापूर्वीचे त्यांचे जीवनही नेमस्त देशकारणाला वाहिलेलेच होते आणि त्या देशकारणाला इंग्रजी अमदानीच्या प्रारंभा पासून महाराष्ट्रात घडलेल्या बहुविध विचारमंथनाची व्यापक पार्श्वभूमी होती. एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकांच्या संधिकाळात गोखले पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम करू लागले. त्यापूर्वी सुमारे दहा वर्षे ते टिळक आगरकर, चिपळूणकर प्रभृतींनी स्थापन केलेल्या ‘डेक्कन एज्युकेशन सोसायटी ’च्या न्यू इंग्लिश स्कूल मध्ये शिकवत होते. सोसायटीचे आजीव सदस्यही झाले होते. अवघ्या पस्तीस रुपयांच्या मासिक वेतनावर ती सेवा पार पाडताना सर्व संबंधितांची आर्थिक कुचंबणा होई. त्या कोंडीतून मार्ग काढण्यासाठी टिळक, आगरकरा प्रमाणेच गोखल्यांनीही विद्यार्थ्यांना उपयुक्त असे गणिताचे एक पुस्तक लिहिले होते. त्यात वापरलेली सोपी, साधी इंग्रजी भाषा व देशी उदाहरणे यांमुळे ते पुस्तक विलक्षण लोकप्रिय झाले. पुढे तर इंग्लंड मधील मॅक्मिलन कंपनीनेही ते प्रकाशित केले. त्याच्या अनेक आवृत्त्याही निघाल्या. नरेन्द्र चपळगावकर यांनी ‘नामदार गोखल्यांचा भारत सेवक समाज’ या नावाने पुस्तक लिहिले आहे. हे पुस्तक छोटेखानी असले तरी आशयाच्या दृष्टीने समृद्ध आहे.
जॉर्ज स्टीफेंसन के माता पिता माबेल और रॉबर्ट निरक्षर थे। पिता कोयले की खदान मे मजदूरी कर परिवार का भरण पोषण करते थे। उनके पास इतने पैसे नहीं थे कि वे अपने बच्चे को स्कूल भेज सकें। बच्चों को स्कूल जाते देख जॉर्ज जब मां से स्कूल भेजने की जिद करते और रोते तो माबेल किसी तरह उन्हे समझा देती कि स्कूल उनके नसीब मे नही है। समय के साथ जॉर्ज अपने माता पिता की विवशता तो समझ गए, लेकिन पढ़ने की प्रबल इच्छा उनके मन मे कही न कही बढती ही रही। इस बालक मे माता पिता के प्रति असीम श्रद्धा थी। यही कारण था कि वह कुछ कमा कर माता पिता की मदद करना चाहते थे। बस इसी चाहत ने पिता की तरह उन्हे भी कोयले की खदान मे मजदूर बना दिया । बतौर मजदूर, जॉर्ज की जो भी कमाई होती, उसे अपने माता पिता को देने मे उन्हे असीम सुख मिलता। लेकिन बचपन मे पढने की जिस भावना ने जन्म लिया था, वह आज भी हरी-भरी थी। जॉर्ज 18 वर्ष के हो चुके थे। एक वर्ष तक मजदूरी करके जब उन्होंने थोडा धन अर्जित कर लिया तो मन में बरसो से दबी पढाई की इच्छा फिर हावी हो गई। बचपन की इस लालसा को पूरा करने के लिए उन्होंने रात्रि पाठशाला मे एडमिशन ले लिया। रोज मजदूरी खत्म करने के बाद वह नाइट स्कूल मे जाते। देखते देखते गणित मे उनकी गहरी रुचि पैदा हो गई, जिसके बल पर वह बिना थियरी पढ़े न केवल सिविल व मैकेनिकल इंजीनियर कहलाए बल्कि अपने समय के डैवी जैसे वैज्ञानिकों को मात देकर खदान मजदूरो के लिए सेफ्टी लैंप बनाया। आगे चलकर हेटन क्वेलरी से संडरलैंड तक आठ मील की पहली रेल लाइन बिछाई। 1814 मे ब्लूचर नामक इंजन विकसित किया और रेल पटरियो को इंजन से जोडकर आधुनिक रेल के जनक कहलाए और औद्योगिक क्रांति को ठोस आधार प्रदान किया।
जन्म - १ एप्रिल १५७८ (फोल्कस्टोन)
स्मृती - ३ जून १६५७ (इंग्लड)
मानवी शरीरातील रक्ताभिसरणाची क्रिया स्पष्ट करणारा इंग्लिश शरीरशास्त्रज्ञ. थॉमस हार्वे नामक एका बुद्धिमान माणसाच्या घरी जन्माला आलेल्या विल्यम हार्वेचा आपल्या वडिलांवर खूप विश्वास होता. आरंभी लॅटिनचे शिक्षण घेऊन त्याने विद्यापीठात प्रवेश घेतला आणि पडुआ विद्यापीठात दाखल झाला. साल होतं १५९९. वयाच्या २५व्या वर्षी पडुआ मधून ‘डॉक्टर ऑफ मेडिसीन’ ही पदवी प्राप्त केली. १५९९ मधे पडुआ विद्यापीठात शिक्षण घेण्यास जेव्हा दाखल झाला, तेव्हा त्या विद्यापीठात गॅलिलिओ अध्यापनाचं कार्य करीत होता. हार्वेच्या काळात सुमारे सात वर्षं गॅलिलिओ गणित, भौतिकशास्त्र आणि खगोलशास्त्र शिकवीत होता. सुदैवाने हार्वेला गॅलिलिओ सारखे दु:खाचे दिवस कधीही बघावे लागले नाही. अतिशय प्रसिद्ध असे शास्त्रज्ञ आणि शल्यविशारद या विश्वविद्यापीठात कार्य करत होते. यापकी एक होते इटालियन शरीररचनाशास्त्रज्ञ फॅब्रिशिअस. अशुद्ध रक्त वाहून नेणाऱ्या शरीरातील नीलांमध्ये असलेल्या झडपा फॅब्रिशिअसने सर्वप्रथम शोधून काढल्या होत्या, पण या झडपांचं कार्य नेमकं कसं चालतं, हे फॅब्रिशिअसला शोधता आलं नाही. फॅब्रिशिअस हा विल्यम हार्वेचा मार्गदर्शक. फॅब्रिशिअसचं अपूर्ण असलेलं संशोधन हार्वे यांनी पूर्णत्वाला नेलं. रक्तवाहिन्यांमधील झडपांचं काम कसं चालतं, हे हार्वे यांनी शोधून काढलं. इतकंच नव्हे तर शरीरात रक्तप्रवाह खेळता ठेवण्यामध्ये यकृत नव्हे तर हृदयाचं कार्य महत्त्वाचं आहे, हे त्यांनी सांगितलं. १६१६ मध्ये असेच एक व्याख्यान सुरू होते. शवविच्छेदनाच्या टेबलवर, देहान्ताची शिक्षा झालेल्या एका व्यक्तीचे प्रेत पडलेले होते. आजूबाजूला अभ्यासक आणि प्रेक्षक आणि थोडे दूर उभे राहून एक काठीच्या मदतीने हार्वे प्रेताचे भाग दाखवीत होता. रक्तवाहिन्यांकडून त्याची काठी हृदयाकडे वळली. तो म्हणाला, ‘‘सर्व रक्तवाहिका रक्ताला हृदयाच्या उजव्या भागात पोहोचवतात आणि हृदय त्या रक्ताला फुफ्फुसा मध्ये स्वच्छ होण्यासाठी ढकलतं. स्वच्छ रक्त पुन्हा हृदयाच्या डाव्या भागात पोचतं आणि तिथून पुन्हा रक्तवाहिन्या मार्फत पूर्ण शरीरात पोहोचविलं जातं. हृदय एका पंपासारखं काम करतं’’ सर्व श्रोतावर्ग स्तब्ध झाला. कुठून आला हा विचार? हृदय तर आत्म्याचं ठिकाण आहे. शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांना हृदयातून नव्हे तर यकृतामधून रक्तपुरवठा केला जातो, असा समज दृढ असलेला तो काळ होता.
आपल्या शरीरातलं रक्त यकृतात तयार होतं आणि यकृताच्या नियंत्रणाखाली ते शरीरात पोहोचवलं जातं हा समज शास्त्रीय पद्धतीने खोटा ठरण्यासाठी तब्बल दीड हजार वर्ष जावी लागली. अनेक शतकांपूर्वी ऍरिस्टॉटल आणि गॅलेन सारख्या विद्वानांनी सांगून ठेवलं होतं की, हृदयात ईश्वर आणि ईश्वराचा पवित्र अंशच विराजमान असतो. या माणसाची (हार्वेची) हिंमत कशी झाली त्या हृदयाला रक्ताचा ‘पंप’ म्हणण्याची? सर्वदूर गदारोळ माजला. रक्त माणसाच्या शरीरातून दोन वेगवेगळ्या मार्गामधून फिरत असतं, असंही हार्वे यांचं म्हणणं होतं. त्यातला एक मार्ग आपल्या शरीरातल्या फुप्फुसापासून सुरू होऊन रक्त शरीरभर नेणाऱ्या मार्गाना जोडलेला असतो, तर दुसरा मार्ग आपल्या शरीरामधलं रक्त महत्त्वाच्या अवयवांकडे नेत असतो, असं मत त्यांनी मांडलं. त्यासाठी त्यांनी काही प्रात्यक्षिकंही करून दाखवली. यासंदर्भात त्यांनी गॅलिलिओचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला होता. केवळ गॅलन सांगतो म्हणून एखादी गोष्ट सत्य किंवा प्रमाण न मानता प्रत्यक्ष प्रयोग करून जे समोर येईल ते आपण सत्य म्हणून स्वीकारले पाहिजे, असं हार्वे यांचं म्हणणं असायचं. प्राण्यांच्या छातीचा पिंजरा उघडून हृदयाचं काम कसं चालतं, हे प्रत्यक्ष पाहणारा हा पहिला शास्त्रज्ञ. गेलननं लिहून ठेवलेलं होतं की, माणसाच्या शरीरात १.५ औंस (म्हणजे ०.०४ लिटर्स) इतकं रक्त असतं. तसंच दर वेळी जेव्हा आपलं हृदय एखाद्या पाण्याच्या हापश्यासारखं रक्त उपसतं तेव्हा या रक्तापैकी १/८ रक्त शरीरात शोषून घेतलं जातं. त्यामुळे तेवढं रक्त सतत बदलावं लागतं असं गेलनचं म्हणणं होतं. हार्वेचं म्हणणं होतं की, रक्त हे शरीरात सतत तयार होऊन वापरलं जात नसतं, तर अधूनमधून तयार होत असतं आणि ते तयार झालं की काळजीपूर्वक वापरून पुन:पुन्हा शुद्ध करून वापरलं जातं. हे ठरवताना त्यानं माणसाच्या हृदयातून दर मिनिटाला किती रक्त जात-येत असतं हे मोजलं. ते आधीच्या अंदाजापेक्षा खूप जास्त असल्याचं त्याच्या लक्षात आलं. म्हणजेच जर हृदयाकडून इतर अवयवांकडे जाणारं रक्त ते अयवय शोषून घेत असतील, तर माणसाच्या शरीरात केवढं रक्त तयार करावं लागेल. किंबहुना ते करणं अशक्यच असेल. गेलनच्या सिद्धांतांना हाही एक सुरुंगच होता. पण गॅलनच्या मतांना चुकीचं ठरवल्यामुळे हार्वे यांच्यावर प्रचंड टीका झाली. गेलनच्या मतांना चुकीचं ठरवण्याची ‘चूक’ त्यानं केलेली होती. विशेष म्हणजे हार्वेने रक्ताभिसरणाचा सिद्धांत शोधण्यासाठी अनेक मुडद्यांवर प्रयोग केले होते. हे काम करण्यासाठी हार्वेने अनेक मुडद्यांची चिरफाड केली. त्या काळात सारख्या लढाया होत नि पुष्कळ माणसं मरत असत, पण चिरफाडीसाठी मुडदे मिळणं अवघडच होतं. मृत सैनिकांचे नातेवाईकच नव्हे, तर सैन्याधिकारीसुद्धा हार्वेला संशोधनासाठी मृतदेह पुरवायला नाखूष असत. यामुळे वैतागलेल्या हार्वेने स्वतःची बहीण आणि स्वतःचे वडील मरण पावल्यावर प्रथम त्यांच्या मृतदेहाचे विच्छेदन केलं. आवश्यक ती शास्त्रीय निरीक्षणं केली आणि मगच त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले.
काही शास्त्रज्ञ त्यांचे संशोधन व निष्कर्ष याबद्दल इतके ठाम असतात, की त्याचे प्रयोग स्वत:वरही करण्याची त्यांची तयारी असते. डॉ. जेन्नर यांनी त्या पुढची पायरी गाठत देवीसारख्या त्या काळी असाध्य मानल्या जाणार्या आजाराची लस आपल्या ११ महिन्यांच्या मुलाला टोचली. ज्ञानाच्या इतिहासामध्ये अनेक संशोधकांनी आपले संशोधन पूर्णत्वास नेण्यासाठी धाडसी प्रयोग केलेले आहेत. हे प्रयोग मुख्यत: उपकरणाच्या उपयोगाच्या बाबतीत होते. जेन्नर यांनी केलेले प्रयोग मात्र तरुण आणि लहान मुलांच्या संबंधातील होते. विशेष म्हणजे, त्यांना आपल्या संशोधनाविषयी आणि आपण केलेल्या अनुमानाविषयी एवढी खात्री होती, की त्यांनी त्यांच्या संशोधनाचा प्रयोग स्वत:च्या ११ महिन्यांच्या मुलावर केला. अठराव्या शतकात जगातील अनेक देशांमध्ये 'देवी' हा रोग अतिशय दुर्धर असा मानला जाई. देवीची लागण झाल्यामुळे शरीरावर अनेक विपरित परिणाम होत आणि काही लोकांना अंधत्व येत असे. त्याचप्रमाणे अनेक मुले या रोगाला बळी पडत.
एखाद्या समस्येने अनेक जण ग्रस्त असतात. मात्र, ती समस्या सोडविण्याचा प्रयत्न करणार्या व्यक्तींची संख्या अगदीच कमी असते. जेन्नर हे तरुणपणी जॉन हंटर या शल्यविशारदाबरोबर त्यांचे साहाय्यक म्हणून काम करीत होते. जॉन हंटर यांनी त्यांना एक कानमंत्र दिला होता. तो म्हणजे 'विचार करू नका, प्रयत्न करा.' जेन्नर यांनी छातीमध्ये होणार्या वेदनांचे मूळ शोधण्याचा प्रयत्न केला. अठराव्या शतकात युरोपमध्ये आपल्याकडील झोपडपट्टींशी साम्य दाखवणारी वसाहत होती. त्यामुळे तेथेही डास, पिसवा यांसारख्या कीटकांचा प्रादुर्भाव होता. त्यामुळे पिसवांपासून होणार्या रोगावरही त्यांनी संशोधन केले.
हे संशोधन करीत असताना 'देवी' या रोगामुळे होणार्या 'अपरिमित नुकसानी' कडे त्यांचे लक्ष गेले. त्या काळी देवी हा रोग असाध्य मानला जाई. त्याचा होणारा प्रादुर्भाव इतका प्रचंड होता, की जवळ जवळ ६० टक्के लोकांना त्याची लागण होत असे. या लागण झालेल्या लोकांपैकी २० टक्के लोक, तर मृत्युमुखी पडत. त्याचप्रमाणे चेहरा विद्रूप होणे, दृष्टीवर परिणाम होणे यांसारख्या गोष्टी घडून येत. देवी या रोगावर उपाय शोधण्याचा विचार करत असताना, त्यांच्या नजरेस एक गोष्ट पडली. गाईची धार काढणार्या स्त्रियांना या रोगाची लागण झाली, तरी त्यांच्यावर या रोगाचा होणारा परिणाम अतिशय कमी असे. या निरीक्षणावर विचार करताना त्यांच्या डोक्यामध्ये अशी कल्पना आली, की गाईंना होणारा देवीचा प्रादुर्भाव आणि त्यांच्या संपर्कातील स्त्रियांना होत नसलेला प्रादुर्भाव यामध्ये काहीतरी रहस्य दडलेले असावे.
गाईच्या संपर्कात आल्यामुळे स्त्रियांना या रोगापासून बचाव करण्याची क्षमता प्राप्त होत असावी हे अनुमान तपासण्यासाठी त्यांनी एक धाडसी प्रयोग केला. गाईला झालेल्या देवीच्या व्रणातील स्राव त्यांनी एका १८ वर्षांच्या तरुणाच्या शरीरात टोचला. त्याचाच परिणाम असा झाला, की, त्या तरुणाला देवीची लागण झाली नाही. असाच प्रयोग त्यांनी इतर २३ व्यक्तींवर केला. त्यामध्येही त्यांना समाधानकारक यश मिळाले. असे होऊनही संशोधकांनी मात्र त्यांचा शोध मान्य केला नाही. शेवटच्या प्रयोगात त्यांनी या चाचणीमध्ये आपल्या ११ महिन्यांच्या मुलाचा समावेश केला. त्यांनी सातत्याने केलेल्या या प्रयोगामुळे संशोधकांना त्यांची दखल घ्यावी लागली. अखेर त्यांचे अनुमान मान्य होऊन देवीच्या रोगावर प्रतिबंधक लस तयार झाली. इंग्रजीमधील Vaccination हा शब्द Vacca म्हणजे गाय या शब्दापासून तयार झालेला आहे. देवीच्या व्रणातील स्राव शरीरामध्ये टोचल्यामुळे मानवाची प्रतिष्ठा कमी होते, असा आक्षेप घेण्यात आला. मात्र, या रोगामुळे हजारो लोक मृत्युमुखी पडतात, याबाबत मात्र त्यांनी आस्था दाखविली नाही. जेन्नर यांची कल्पकता आणि त्यांची धाडसी वृत्ती यामुळे हे वरदान प्राप्त झाले.
"Thought is subversive and revolutionary, destructive and terrible, Thought is merciless to privilege, established institutions, and comfortable habit. Thought is great and swift and free." ~ बर्ट्रांड रसेल
बर्ट्रांड रसेल हे एकोणिसाव्या-विसाव्या शतकातील एक प्रमुख तत्त्वज्ञ, गणिती, इतिहासकार, सामाजिक-राजकीय टीकाकार. या माणसानं पुस्तकं लिहिली, लेख लिहिले, भाषणं दिली, वाद घातले. जन्मभर विचारांचा पाठपुरावा केला. सत्य, विवेक, उदारमतवाद, युद्ध, हट्टाग्रह यांबद्दल रसेलनं गेल्या शतकात लिहून ठेवलेलं आजही तितकंच लागू आहे. वैचारिक स्पष्टता आणि निष्पक्ष चिकित्सा हे रसेल यांच्या साहित्याचे वैशिष्ट्य. व्यक्ती कितीही महनीय असली, तरी रसेल तिच्या मोठेपणाचे दडपण घेत नाहीत. तिच्या विचारांना तर्कसंगतीची कसोटी लावून त्यातील काय ग्राह्य आणि काय त्याज्य याची निर्भिड चर्चा ते करतातच. 'अनपॉप्युलर एसेज्' मध्ये रसेल प्लेटो, अॅरिस्टॉट्ल पासून ते लेबनीझ, कांट, हेगेल, मार्क्स या सर्वांच्या विचारांमधील किंवा वर्तणुकीतील विसंगतीची चर्चा करतात. त्यामागील हेतू अर्थातच त्या व्यक्तीची अप्रतिष्ठा करणे हा नसून, विवेकवादाचा प्रसार हाच असतो. आपल्या समजुती, आपले आचार-विचार सर्वश्रेष्ठ, आपली जात किंवा धर्म सर्वांत योग्य असे मानून ते इतरांवर लादण्याच्या प्रवृत्ती विरुद्ध रसेल जन्मभर लढले. त्यासाठी त्यांनी लेखणी हेच अस्त्र वापरले. 'अनपॉप्युलर एसेज्' हे असेच एक अस्त्र होय. त्यातील लेखांचे विषय वरकरणी निरनिराळे वाटले, तरी त्यांमधील अंतःप्रवाह एकच आहे. तो म्हणजे सत्ताधार्यांच्या किंवा बलवानांच्या हट्टाग्रहांपायी समस्त मानवजातीस सहन करावा लागलेला त्रास.
हट्टाग्रहांना दूर कसे ठेवायचे याचेही अनेक साधे-सोपे मार्ग रसेल सुचवतात. त्यातील सर्वांत व्यवहार्य मार्ग म्हणजे विज्ञानाची कार्यपद्धती शिरोधार्य मानणे. विज्ञान कधीही कुठल्याही सिद्धांतास त्रिकालाबाधित सत्य समजून कवटाळून बसत नाही. त्या त्या परिस्थितीतील सर्वांत संभवनीय स्पष्टीकरण याच दृष्टिकोनातून त्यांकडे बघते. नव्या प्रयोगांमधून नवी निरीक्षणे समोर आली, तर आधीचे निष्कर्ष बदलण्याची तयारी ठेवते. विज्ञान वैज्ञानिकांची किंवा प्रचलित समजुतींची सत्ता मानत नाही. म्हणूनच विज्ञान नव्या विचारांचा गळा घोटत नाही. याउलट धर्मशास्त्रांत सत्ता व्यक्तींची किंवा व्यक्तींनी बनवलेल्या नियमांची असते. कालांतराने अशा व्यक्तींचे देव तरी होतात किंवा सत्ताधारी तरी. मग त्यांनी केलेले नियम मोडणे हे पाप तरी समजले जाते, किंवा गुन्हा तरी.
विज्ञान कोणालाही देव करत नाही, तरी ते नम्र व लवचीक असते. याउलट धर्मशास्त्रे उद्दाम व ताठर होतात. सत्य हा अनेकदा सत्याचा आभास असतो. हा आभास कधी बुद्ध्या तयार केलेला असतो, तर कधी माणसाच्या आकलनशक्तीला पडलेल्या मर्यादांमुळे निर्माण होतो. या मर्यादांचे भान असणे, म्हणजे विवेक. असे भान माणसाला स्वमत-आग्रहांपासून परावृत्त करते; दुसर्याला आपल्यापेक्षा निराळे मत असण्याचा अधिकार आहे, हे मान्य करते. हाच झाला उदारमतवाद. आज जगाला या दोन्ही गुणांची नितांत गरज आहे, असे रसेल पोटतिडिकीने १९४० साली सांगत होते, कारण त्या वेळी जगाचा प्रवास पहिल्या महायुद्धा कडून दुसर्या महायुद्धाकडे सुरू होता.
विल्यामिना पॅटन स्टीवन्स फ्लेमिंग ही स्कॉटलंड मध्ये जन्मलेली अमेरिकन अंतरिक्ष शास्त्रज्ञ होती. हिने ताऱ्यांना नावे देण्याची प्रमाण पद्धत विकसित करण्यात योगदान दिले व हजारो तारे व इतर अवकाशीय वस्तूंना शास्त्रीय नावे दिली. फ्लेमिंग स्कॉटलंड मध्ये शालेय शिक्षिका होती. २१ वर्षांची असताना ती आपल्या पतीबरोबर बॉस्टनला स्थलांतरित झाली. येथे आल्यावर तिने हार्वर्ड कॉलेज वेधशाळेच्या निदेशक एडवर्ड चार्ल्स पिकरिंग यांच्या घरी मोलकरणीची नोकरी पत्करली. तिच्या शास्त्रीय व व्यावहारिक ज्ञानाने प्रभावित होउन पिकरिंगने फ्लेमिंगला आपल्या वेधशाळेत नोकरी देऊ केली व ताऱ्यांच्या प्रकाशपटलांचा अर्थ लावण्याचे शिकविले. त्या आधारावर फ्लेमिंगने ताऱ्याच्या प्रकाशपटलातील उदजनाच्या प्रमाणावरून शास्त्रीय वर्गीकरण करण्याची पद्धत विकसित केली. याशिवाय तिने १०,००० पेक्षा तारे, ३९ तारकामेघ, ३१० अस्थिर तारे आणि १० नोव्हा बद्दलच्या शास्त्रीय माहितीची नोंद केली. १८८८साली फ्लेमिंगने होर्सहेड तारकामेघ शोधला. सुरुवातीला तिला याचे श्रेय देण्यात आले नव्हते. १९०८ मध्ये फ्लेमिंगची ख्याती झाल्यावर तिले हे श्रेय देण्यात आले.
दिनविशेष :- 16 जून - वर्ल्ड रिफिल डे संपूर्ण वर्षभराचे दिनविशेष पहा. Click Here टिकाऊ पर्यायांचा अवलंब केल्याने कचरा कमी होतो, संसाधनांचे सं...