Showing posts with label 05june. Show all posts
Showing posts with label 05june. Show all posts

Tuesday, 6 May 2025

दिनविशेष - जागतिक पर्यावरण दिन - 5 जून माहिती | World Environment Day - 5 June

दरवर्षी ५ जून हा दिवस ‘जागतिक पर्यावरण दिन’ म्हणून साजरा केला जातो. पर्यावरण (Environment) हा शब्द मूळ फ्रेंच शब्द Environ या शब्दापासून तयार झाला आहे. Environ म्हणजे Surrounding or encircle. 

सजीव निर्जीव यांच्या मधील क्रिया प्रतिक्रिया व आंतरक्रिया मधून साकार झालेली सजीवाच्या सभोवतालची परिस्थिती म्हणजे पर्यावरण होय.



पर्यावरण दिन साजरा करण्यामागील मुख्य हेतू

  • पर्यावरणाची गुणवत्ता वाढवणे, 
  • समस्या व संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण करणे  
  • पर्यावरणविषयक निर्णय घेण्याची क्षमता निर्माण व्हावी म्हणून पोषक वातावरणाची निर्मिती करणे, हा पर्यावरण दिन साजरा करण्यामागचा मुख्य हेतू आहे.

सजीव निर्जीव यांच्या मधील क्रिया प्रतिक्रिया व आंतरक्रिया मधून साकार झालेली सजीवाच्या सभोवतालची परिस्थिती म्हणजे पर्यावरण होय. पहिल्या महायुद्धा नंतर मानवाच्या निसर्गावरील आघाताचे परिणाम शास्त्रज्ञांच्या लक्षात आले. त्याच प्रमाणे औद्योगिक क्रांतीच्या फळा बरोबर त्याचे दूरगामी गंभीर परिणाम मानवाला भेडसावू लागले. म्हणून १९६० मध्ये पर्यावरणशास्त्र किंवा पर्यावरण विज्ञान हे विषय अभ्यासासाठी स्वतंत्रपणे लागू करण्यात आले.

मानव हा पर्यावरणाचाच एक कुशाग्र घटक आहे. मात्र पर्यावरणाच्या प्रत्येक घटकात मानवी हस्तक्षेप वाढत चालला आहे. म्हणून पर्यावरणीय आपत्तीचे शास्त्रीय पद्धतीने अध्ययन व त्यावर परिणामकारक उपाय योजना करण्यासाठी शिक्षण महत्त्वपूर्ण बनले आहे. त्यादृष्टीने पर्यावरणाचा अभ्यास तीन भागात करणे आवश्यक आहे. ते तीन भाग म्हणजे पर्यावरण विज्ञान, पर्यावरण शिक्षण आणि पर्यावरण तंत्रज्ञान.



पर्यावरण विज्ञान :

यामध्ये तत्त्व, सिद्धांत व जैविक अजैविक घटका मधील आंतरक्रियांचा समावेश होतो. पर्यावरण शिक्षणात परिसंस्था- रचना, कार्य, संरक्षण व संवर्धन, जैवविविधता, प्रदूषण, पर्यावरणीय आपत्ती मानवी व नैसर्गिक, जैवलोकसंख्या, पर्यावरणाचा धारणक्षम निरंतर शाश्वत विकास आणि पर्यावरणीय संस्थांच्या भूमिका व कार्याचा यात ऊहापोह होतो. यामध्ये मृदावरण, जीवावरण, जलावरण व वातावरण या सर्व घटकांचाही समावेश आहे. पर्यावरणाच्या अभियांत्रिकी शाखा मधून पर्यावरणातील विविध तत्त्व, संबोधक आणि सिद्धांता सोबतच विविध पर्यावरणातील घटकांचे विश्लेषण, तत्त्वज्ञानाचे उपयोजन आणि पर्यावरण संरक्षण व संधारणासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा, या संदर्भात मार्गदर्शन केले जाते.

जॉर्ज पर्किन व मर्श यांनी त्यांच्या ‘मॅन अँड नेचर’ या पुस्तकात मानव व नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर व त्याचे विपरीत परिणाम यावर चर्चा केली आहे. त्यांचे हे पुस्तक पर्यावरण शिक्षण देणारे पहिले पुस्तक ठरते. १८९९ मध्ये पॅट्रिक गेडेस यांनी ‘द आऊटलूक टॉक’ या नावाची संस्था स्थापन केली. या संस्थेचे कार्य ‘पर्यावरण शिक्षण सुधारणा’ असे होते. 

पर्यावरण शिक्षणातून जाणीव, जागृती करून पर्यावरणाचा ऱ्हास थांबवणे यासाठी १९६५ मध्ये पर्यावरण शिक्षण हा विषय शिक्षणशास्त्रात समाविष्ट करण्यात आला, तर १९७० मध्ये पॅरिस येथे भरलेल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत शालेय शिक्षणात पर्यावरण शिक्षणावर भर देण्यात आला. 

जून १९७२ मध्ये स्टॉकहोम येथे भरलेल्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या पर्यावरण परिषदेत जागतिक पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करण्याची जबाबदारी मानवाचीच असल्याचे म्हटले आहे आणि त्यानुसार आंतरराष्ट्रीय पर्यावरण शिक्षण कार्यक्रम अमलात आणला व त्याची उद्दिष्टे ऑक्टोबर १९७५ मध्ये बेलग्रेड येथील कृतिसत्रात ठरविण्यात आली.


पर्यावरण शिक्षण:

यात पर्यावरणा विषयी ज्ञान, आकलन, कौशल्य, जागृती आणि प्रत्यक्ष अनुभव घेऊन प्रत्येकाने आपली सकारात्मक मनोभूमिका निर्माण करते. तसेच पर्यावरण शिक्षण ही एक सातत्यपूर्ण जीवनभर चालणारी प्रक्रिया आणि हे शिक्षण सर्व शालेय स्तरावर औपचारिक व अनौपचारिक स्वरूपात असेल; जेणेकरून पर्यावरणबविषयक एकसंध आणि संतुलित दृष्टिकोन प्रत्येक मानवा मध्ये निर्माण होईल. आपल्या देशात पर्यावरणाची गुणवत्ता विकसित करणे, जनते मध्ये पर्यावरण संरक्षणाची व संधारणाची ऊर्मी निर्माण करणे आणि निर्णय घेण्याची पात्रता विकसित करणे ही पर्यावरण शिक्षणाचे मुख्य ध्येये ठरविण्यात आली.


पर्यावरण शिक्षण सद्य स्वरूप :

बिलिसी येथे भरलेल्या पर्यावरण विषयक परिषदेत पर्यावरण शिक्षणाची खालील तत्त्वे निश्चित करण्यात आली-

पर्यावरणीय शिक्षणात सामाजिक तंत्रज्ञान विषयक आणि नैसर्गिक पर्यावरणाचा एकत्रितपणे विचार व्हावा.

पर्यावरण शिक्षण ही एक जीवनभर चालणारी शिक्षण प्रणाली असावी, ज्यात शाळापूर्ण शिक्षण, औपचारिक आणि अनौपचारिक शिक्षण यांचा समावेश असावा.

अध्ययन कर्त्यांला पर्यावरणाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी नियोजन व अंमलबजावणी करण्याची संधी द्यावी.

पर्यावरण शिक्षणाचा उपागम (Approach) आंतर विद्याशास्त्रीय असावा. त्यातून विद्यार्थ्यांचा पर्यावरण विषयक एकसंध व संतुलित दृष्टिकोन निर्माण व्हावा.

वास्तव जीवनाशी निगडित समस्या याच पर्यावरण शिक्षणाच्या केंद्रस्थानी असाव्यात.

पर्यावरण विषयक सकारात्मक दृष्टिकोन व मूल्य निर्मिती करणे ही या शिक्षणाची महत्त्वपूर्ण उद्दिष्टे असावीत.

प्रमुख पर्यावरणीय प्रश्नाची उकल स्थानिक, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय सहकार्यातून करावी.

आज पर्यावरण शिक्षणातील जागरूकता, ज्ञान, दृष्टिकोन, कौशल्य आणि सहभाग ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार (१८ डिसेंबर २००३) पर्यावरण शिक्षणाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. सदर आराखड्यात प्रत्येक शालेय स्तरावर पर्यावरण शिक्षणाची उद्दिष्टे व पाठय़क्रम ठरविण्यात आले आहेत.


पर्यावरण संवर्धन व संरक्षण 

प्लॅस्टिकचा वापर पर्यावरणासाठी अत्यंत हानिकारक आहे याची जाणीव सर्वांना असून त्याचा वापर थांबविण्यावर आपण भर दिला पाहिजे. अशा परिस्थितीत यंदाची थीमही यावर आधारित असून, ‘बीट प्लास्टिक पॉल्यूशन’ असे नाव देण्यात आले आहे.


ग्लोबल वार्मिंगमुळे पर्यावरणाचा होणारा ऱ्हास व डोंगमाथ्यावरील मातीची धूप रोखण्यासाठी आणि शेतकऱ्याचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी बांधावर विविध देशी झाडे लावावी.


पर्यावरणाच्या र्‍हासामुळे बदललेले निसर्गचक्र व त्यामुळे नेहमीच येणारे ओल्या-सुक्या दुष्काळाचे दुश्चक्र आपण सातत्याने अनुभवित आहोत.


अन्न, वस्त्र व निवारा तसेच आरोग्यदायी पर्यावरण या मूलभूत गरजांसाठी मानव संपूर्णपणे वनस्पतींवर अवलंबून आहे. 


शेतक-यांनी पारंपरिक शेती आणि पर्यावरणाला अनुकूल विषमुक्त शेती पद्धतीचा शेतीसाठी उपयोग केला पाहिजे


घातक कीडनाशकांचा अनियंत्रित वापर मानव व पर्यावरणाला धोकादायक ठरत आहे.


हायब्रीड बियांण्यांमुळे पारंपारिक बियाणेसुद्धा कायमचे नष्ट होत चालले आहे,पारंपारिक बियाण्याशिवाय पर्यावरणपूरक, सुरक्षित, व विषमुक्त आहार देणारी शेती अशक्य आहे,


देशी गाईंच्या शेणामध्ये अनेक घटक आहेत, ज्यात माणूस, शेती पर्यावरण, भावी पिढीचा विकास या गोष्टींचा अंतर्भाव आहे.


शेती केवळ भौतीक जीवन फुलवते असे नसुन नैतीक आत्मिक व पर्यावरणीय अंगांनी जीवन परिपुर्ण करते.


पर्यावरण दिन हा फक्त एकच दिवस साजरा करण्याचा नसुन , पर्यावरण रक्षण ही रोजची जबाबदारी आहे. हा वसा एकदा घेतला की टाकून चालणार नाही.


चला आपण सर्व मिळून पर्यावरण संवर्धन व संरक्षण करूया.

दिनविशेष :- 05 जून - ब्रम्होस मिसाईलचे परीक्षण

दिनविशेष :- 05 जून - ब्रम्होस मिसाईलचे परीक्षण



संपूर्ण वर्षभराचे दिनविशेष पहा. Click Here


भारताने ५ जून २०१८ रोजी समुद्रावरून जमिनीवर हल्ला करणारे ब्रह्मोस मिसाईलचे सफल परीक्षण केले. ब्रह्मोस हे नाव भारतातील ब्रह्मपुत्रा आणि रशियातील मॉस्क्वा या दोन नद्यांच्या नावांतील सुरुवातीची अक्षरे एकत्र करून बनवले आहे. भारताने रशियाच्या सहकार्याने ब्रह्मोस हे सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र विकसित करण्यास प्रारंभ केला. आज ते जगातील सर्वोत्तम क्रूझ क्षेपणास्त्र समजले जाते. ब्रह्मोसची रचना रशियाच्या पी-८०० ओनिक्स या क्षेपणास्त्रावर आधारित आहे. याच्या निर्मितीसाठी भारत आणि रशिया यांनी ब्रह्मोस एरोस्पेस लिमिटेड या संयुक्त कंपनीची स्थापना केली आहे. ब्रह्मोसचे ६५ टक्के भाग रशियात तयार होतात. त्यात बुस्टर, रॅमजेट इंजिन, टार्गेट सीकर, होमिंग डिव्हाइस, कॅनिस्टर आदी भागांचा समावेश आहे. ब्रह्मोस हे दोन टप्प्यांचे (स्टेजेस) क्षेपणास्त्र आहे. त्यातील पहिला टप्पा घनरूप इंधनावर आधारित बुस्टरचा आहे. तर दुसरा टप्पा द्रवरूप इंधनावर आधारित रॅमजेट इंजिनाचा आहे. त्याला दिशादर्शनासाठी इनर्शिअल नेव्हिगेशन सिस्टिम आणि जीपीएस, ग्लोनास किंवा भारतीय गगन या कृत्रिम उपग्रहांवर आधारित प्रणाली वापरल्या जातात. ब्रह्मोसचा पल्ला २९० किमी असून त्यावर ३०० किलो वजनाची पारंपरिक स्फोटके किंवा अण्वस्त्रे बसवता येतात. ब्रह्मोस सध्या जगातील सर्वात वेगवान आणि अचूक क्रूझ क्षेपणास्त्र मानले जाते. त्याचा वेग ध्वनीच्या वेगापेक्षा २.८ ते ३ पट आहे. म्हणजे ब्रह्मोस एका सेकंदात १ किमी अंतर पार करते. तसेच त्याची नेम चुकण्याची क्षमता (सक्र्युलर एरर प्रॉबेबिलिटी - सीईपी) १ मीटर पेक्षा कमी असल्याचा दावा केला जातो. म्हणजेच त्याची अचूकता ९९.९९ टक्के आहे. क्रूझ क्षेपणास्त्र असल्याने ब्रह्मोस जमिनीपासून कमी उंचीवरून प्रवास करून शत्रूच्या रडारला चकवा देऊ शकते. तसेच मार्ग बदलून क्षेपणास्त्र विरोधी यंत्रणा पासून बचाव करून घेऊ शकते. ब्रह्मोस जमीन, पाणी तसेच हवेतून डागता येते. भारताच्या तिन्ही सेनादलांत आणि रशियाच्या सैन्यात ब्रह्मोस तैनात केले जात आहे.

*संदर्भ : विकिपीडिया*

दिनविशेष :- 05 जून - डॉ. आंबेडकर यांना LLD पदवी प्रदान

दिनविशेष :- 05 जून - डॉ. आंबेडकर यांना LLD पदवी प्रदान



संपूर्ण वर्षभराचे दिनविशेष पहा. Click Here


विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर को LLD उच्च पदवी कोलंबिया विश्वविद्यालय अमेरिका से 5 जून 1952 को प्रदान की गयी। मई १९५२ को कोलंबिया विश्वविद्यालय अमेरिका को २०० वर्ष पूरे होने के समारंभ पर डॉ. बाबासाहेब आंबेडकर को 'डॉक्टर ऑफ लाॅज' एलएलडी यह उच्च पदवी अर्पण करने का समाचार प्रसिद्ध हुआ। बाबासाहेब ने इस विश्वविद्यालय मे एमए एवं पीएचडी की अर्हता प्राप्त की थी। 'विद्वान सर्वत्र पूज्यते' यह अमर वचन की यह प्रचीती है। इस शुभ अवसर पर ३१ मे १९५२ को क्रिकेट क्लब ऑफ इंडिया, मुंबई मे आयोजित समारंभ मे बाबासाहेब का सत्कार किया गया। डॉ. बाबासाहेब आंबेडकर 1 जून 1952 को मुंबई से न्युयॉर्क (अमेरिका) रवाना हुए। बाबासाहेब के अनुयायी एवं चहेतो ने सांताक्रूझ (मुंबई) विमानतल पर निरोप दिया। ५ जून १९५२ को हुए पदवी प्रदान समारोह मे बाबासाहेब को 'डॉक्टर ऑफ लाॅज' एलएलडी यह उच्च पदवी से सम्मानित किया गया। कोलंबिया विश्वविद्यालय ने अर्पण पत्र मे बाबासाहेब के गौरव मे कहा "भारतीय संविधान के शिल्पकार, मंत्री परिषद के सदस्य एवं राज्यसभा के सभासद, भारतीय नागरिको से एक प्रमुख नागरिक, एक महान समाजसुधारक और मानव अधिकारो का आधारस्तंभ, एक पराक्रमी पुरुष।" बाबासाहेब १४ जून १९५२ को भारत (मुंबई) लौटे।


*संदर्भ* : 

*भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर -धनंजय कीर २००९*

दिनविशेष :- 05 जून - कार्यकर्त्या आनंदीबाई धोंडो कर्वे जन्मदिन

दिनविशेष :- 05 जून - कार्यकर्त्या आनंदीबाई धोंडो कर्वे जन्मदिन
जन्म - ५ जून १८६३ 
स्मृती - २९ नोव्हेंबर १९५० (हिंगणे,पुणे)



संपूर्ण वर्षभराचे दिनविशेष पहा. Click Here

१९४४ मध्ये महर्षी कर्वे यांच्या सहधर्मचारिणी आनंदीबाई कर्वे ऊर्फ बाया कर्वे यांचे ‘माझे पुराण’ प्रसिद्ध झाले. बालविधवेचे पूर्वजीवन वाट्याला आलेल्या आणि त्या अनुभवाने पोळल्यामुळे काहीशा रूक्ष, व्यवहारी आणि सकृद्दर्शनी अत्यंत हिशेबी वाटणाऱ्या, पण अंत:करणात दीन-दुबळ्यांविषयी अपरंपार कळवळा असणाऱ्या आनंदीबाई ऊर्फ बाया कर्वे. आधी बालविधवा म्हणून आणि नंतर पुनर्विवाहित म्हणून समाजाची उपेक्षा वाट्याला आली तरी लाचारी न पत्करता, स्वतःच्या मस्तीत, स्वतःच्या मर्जीनुसार जगणाऱ्या आनंदीबाईंच्या जीवनाची ही आगळीवेगळी कहाणी. माहेरची गरिबी आणि अगदी अजाण वयातच आनंदीबाईंना आलेले वैधव्य. वैधव्याचा पुरेसा अर्थही कळत नाही तोच त्यांची सासरी रवानगी झाली. आपल्या स्थितीची खरी जाणीव आनंदीबाईंना झाली ती त्यांना विकेशा व्हावे लागले त्या वेळी. केशवपनाच्या करुण प्रसंगाचा आनंदीबाईंनी कथन केलेला वृत्तान्त कोणत्याही सहृदय वाचकाच्या काळजाला हात घालणारा. त्या म्हणतात, "त्या काळी केस काढून घेण्यास तयार न होणाऱ्या विधवांचे फार हाल होत. त्यांना मार खावा लागे. दोराने बांधीत व इतरही बरेच हाल करीत, ते मला माहीत होते. आपण जर हट्ट केला, तर आपलेही असेच हाल होतील, अशी मला भीती वाटे. हट्ट न धरला तर पुढच्या भयंकर प्रसंगाच्या कल्पनेने अंगावर शहारे येत. झाले. एक दिवस ठरला. मला त्या दिवशी क्षेत्रावर नेण्याचे ठरले. पण क्षेत्रावर जाण्यास मी कबूल नव्हते व ते मी धीर करून स्पष्ट सांगितले. तुम्हाला इथंच काय करायचं ते करा. क्षेत्राबित्रावर मात्र मी येणार नाही." पुढे त्या म्हणतात, "विधवा मुलीची इतकी विटंबना का व्हावी हे मला उमजेना. मी असे काय पाप केले? मी तो सबंध दिवस रडून घालवला. पण उपयोग काय त्याचा. अशा कितीतरी मुली आतापर्यंत माझ्या सारख्या रडल्या असतील, पण त्याचे समाजाला काय?" हा प्रसंग एकदा यायचा असता तर त्याचे दु:ख काही दिवसांनी तरी विसरले असते. पण दर महिन्याला त्याची पुनरावृत्ती होई. आधी विधवा म्हणून आणि नंतर कर्वेशी पुनर्विवाह केला म्हणून लोकांची सतत अवहेलनाच वाट्याला आली, तरी स्वतःतल्या खमकेपणामुळे आनंदीबाई लोकांच्या या टीकेकडे दुर्लक्ष करू शकल्या. प्रथम रमाबाईंच्या प्रोत्साहनाने शारदासदनात आणि नंतर कर्वेच्या प्रोत्साहनामुळे हुजूरपागेत त्यांचे शिक्षण झाले तरी स्वतःच स्वतःला घडविण्याची खरी प्रक्रिया सुरू झाली ती सासुबाईं कडून मिळालेल्या आणि आनंदीबाईंनी कानात साठवून ठेवलेल्या जीवन शिक्षणातूनच. बालपणी दारिद्रय़ाचे चटके सोसून आणि पुढे वैधव्याचे भोग वाट्याला येऊनही नशिबाला दोष देत रडत राहण्या ऐवजी हसत हसत दुर्दैवाला सामोरे जाण्याची एक जीवनशैली आनंदीबाईंनी जोपासली  होती. उतारवयात स्वतःला परावलंबी जिणे जगायला लागू नये म्हणून मुलाकडे आफ्रिकेला गेल्या तरी तिथेही शांत न बसता आश्रमासाठी भाऊबीज फंड उभा करणाऱ्या आनंदीबाईंचे समर्पित असलेले बहुरूपी आयुष्य हे सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेरचे होते. स्त्री-शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी, स्वतंत्र संस्था उभारून त्या संस्थांच्या वाढीसाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचणाऱ्या महर्षी कर्वेचे एक पाऊल सदैव घराबाहेर असे. त्यांच्यासमवेत राहून त्यांच्या खांद्याला खांदा देऊन संस्थेसाठी काही करण्याचे भाग्य आनंदीबाईंच्या वात्याला आले. आश्रमासाठी पैसा साठवणे आणि देणग्या गोळा करणे हा एकच ध्यास त्यांनी अखेपर्यंत बाळगला. आयुष्यभर स्वतः काटकसर करून संस्थेसाठी हातात झोळी घेऊन हिंडणाऱ्या आनंदीबाईंचे व्यक्तिमत्त्व आगळेच होते. लोकनिंदेची पर्वा न करता अंतर्मनाचा कौल मानून त्याप्रमाणे आचरण करण्याचे धाडस दाखवणाऱ्या व स्वतंत्र बाण्याच्या आनंदीबाईंचे संपूर्ण जीवन म्हणजे खुले पुस्तक होते. समाजरूढी नि परंपरा बदलून विधवांना निकोप जीवन जगण्याचा हक्क मिळावा म्हणून झटणाऱ्या आनंदीबाई उर्फ बायाबाई कर्वे यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन.

दिनविशेष :- 16 जून - वर्ल्ड रिफिल डे

दिनविशेष :- 16 जून - वर्ल्ड रिफिल डे संपूर्ण वर्षभराचे दिनविशेष पहा. Click Here टिकाऊ पर्यायांचा अवलंब केल्याने कचरा कमी होतो, संसाधनांचे सं...