दिनविशेष :- 12 जून - खगोलशास्त्रज्ञ मार्गेरिटा हॅक जन्मदिन
जन्म - १२ जून १९२२ (फ्लॉरेन्स,इटली)
स्मृती - २९ जून २०१३
संपूर्ण वर्षभराचे दिनविशेष पहा. Click Here
इटालियन खगोलशास्त्रज्ञ मार्गेरिटा हॅक यांचा जन्म इटली मधील फ्लॉरेन्स येथे झाला. ट्रिस्टे विद्यापीठात मार्गेरिटा हॅक या खगोलाच्या प्रोफेसर म्हणून काम करत होत्या. १९६४ ते १९८७ खगोलशास्त्रीय वेधशाळेचे प्रशासन सांभाळणाऱ्या त्या पहिल्या इटालियन महिला होत्या. मार्गेरिटा यांच्या वैज्ञानिक जिज्ञासेचा आणि रिसर्च अॅक्टिव्हिटीचा व्यासंग फार मोठा होता. ताऱ्यांच्या नेत्रदीपक वैशिष्ट्या बबात त्यांना विशेष रस होता. त्यामध्येच त्यांचे नैपुण्य देखील होते. या बाबतच्या अभ्यासामध्ये ताऱ्यांच्या निर्मिती मधील केमिकल कम्पोझिशन, त्यांच्या पृष्ठभागावरील तापमान आणि ग्रॅव्हिटी यांचा त्यांनी अभ्यास केला होता. १९७० मध्ये त्यांनी कोपर्निकस उपग्रहा मधून युव्ही डाटा वर काम केले होते. त्यांचा पहिला रिसर्च कोपर्निकस वर आधारित डाटा मधून १९७४ मध्ये 'नेचर' या मासिकात मध्ये प्रसिद्ध झाला होता. विज्ञाना सोबतच त्या शिक्षण क्षेत्रा मध्येही कार्यरत होत्या. राजकीय घडामोडींची देखील त्यांना आवड होती. २०१२ मध्ये त्यांच्या ९०व्या वाढदिवसाला त्यांना 'दमा डी ग्रान क्रोस' या इटालियन रिपब्लिकच्या सर्वोच्च पुरस्काराने गौरवण्यात आले होते. त्यांच्या जन्मदिनी गूगलने डूडल बनवले होते. या डूडल मध्ये मार्गेरीटा यांना टेलिस्कोपद्वारे आकाशाकडे पाहताना दाखवले होते.

No comments:
Post a Comment