Sunday, 11 May 2025

दिनविशेष :- 13 जून - आचार्य प्रल्हाद केशव अत्रे स्मृतिदिन

दिनविशेष :- 13 जून - आचार्य प्रल्हाद केशव अत्रे स्मृतिदिन

जन्म - १३ ऑगस्ट १८९८ (पुरंदर,पुणे)

स्मृती - १३ जून १९६९ (मुंबई)


संपूर्ण वर्षभराचे दिनविशेष पहा. Click Here

मराठीतील नावाजलेले लेखक, कवी, नाटककार, संपादक, पत्रकार, चित्रपट निर्माते, शिक्षणतज्ज्ञ, राजकारणी व वक्ते आचार्य प्रल्हाद केशव अत्रे. १९३४ साली सरस्वती सिनेटोनच्या दादा तोरण्यांच्या आग्रहाखातर नारद-नारदी चित्रपटाची कथा व संवाद अत्र्यांनी लिहून दिले. 'हंस पिक्स्चर्स' साठी १९३७ साली त्यांनी इब्सेनच्या 'पिलर ऑफ द सोसायटी' या कथेवरून धर्मवीर, स्वतःच्याच कथांवरून प्रेमवीर ह्या मराठी व 'बेगुनाह' या हिंदी चित्रपटांच्या पटकथा लिहून दिल्या. १९३८ साली 'हंस' साठीच 'ब्रह्मचारी' चित्रपटाची कथा त्यांनी लिहून दिली. त्यांनी लिहिलेला 'ब्रँडीची बाटली' हा चित्रपटही लोकप्रिय ठरला. अत्र्यांनी राजगुरू व अभ्यंकर या इतर दोन भागीदारांसोबत एआरए या नावाने 'नवयुग चित्रपट कंपनी' काढली. पुढे 'हंस पिक्चर्स' मधले मास्टर विनायक, पांडुरंग नाईक, बाबूराव पेंढारकर हे देखील भागीदार झाल्यावर या कंपनीने ’नवयुग पिक्चर्स’ असे नाव बदलून घेतले. १९४० साली नवयुग पिक्चर्स तर्फे 'लपंडाव' चित्रपटाची कथा अत्र्यांनी लिहिली. 'लपंडाव' चित्रपटानंतर त्यांनी 'संत सखू' या चित्रपटाचे संवाद लिहिले. परंतु 'प्रभात'ने ही हाच विषय घेतला आहे या कारणाने मास्टर विनायकांनी त्याला विरोध केला. नवयुग पिक्चर्सने मग वि.स. खांडेकरांची 'अमृत' ही कथा घेऊन चित्रपट काढावयाचे ठरवले. या वादामुळे अत्र्यांनी नवयुग पिक्चर्स सोडले. अत्र्यांनी दिग्दर्शित केलेल्या 'श्यामची आई' चित्रपटाला १९५४ साली सुरू झालेल्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहोळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे पहिले 'सुवर्ण कमळ' मिळाले होते. १९२३ साली अत्र्यांनी 'अध्यापन' मासिक सुरू केले. १९२६ मध्ये 'रत्नाकर', १९२९ साली 'मनोरमा' आणि पुढे १९३५ साली 'नवे अध्यापन' व १९३९ साली 'इलाखा शिक्षक' ही मासिके काढली. १९४० साली त्यांनी 'नवयुग' साप्ताहिक सुरू केले. १९५६ साली त्यांनी 'मराठा' हे दैनिक सुरू केले. ते त्यांच्या हयाती नंतरही काही काळ प्रकाशित होत होते. समाजातील दुर्बल घटक, गोरगरीब, तळागाळातील माणसे, अज्ञजन, उपेक्षित, दलित यांचा आपल्या सामर्थ्यानिशी अत्र्यांनी सतत कैवार घेतला. आचार्य अत्रे हे महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी उभ्या राहिलेल्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील प्रमुख नेते होते.

No comments:

Post a Comment

दिनविशेष :- 16 जून - वर्ल्ड रिफिल डे

दिनविशेष :- 16 जून - वर्ल्ड रिफिल डे संपूर्ण वर्षभराचे दिनविशेष पहा. Click Here टिकाऊ पर्यायांचा अवलंब केल्याने कचरा कमी होतो, संसाधनांचे सं...