Showing posts with label 07june. Show all posts
Showing posts with label 07june. Show all posts

Tuesday, 6 May 2025

दिनविशेष :- 07 जून - जागतिक अन्न सुरक्षा दिवस

दिनविशेष :- 07 जून - जागतिक अन्न सुरक्षा दिवस



संपूर्ण वर्षभराचे दिनविशेष पहा. Click Here


७ जून २०१९ रोजी पहिला जागतिक अन्न सुरक्षा दिवस साजरा करण्यात आला. हा दिवस संयुक्त राष्ट्र महासभा द्वारे डिसेंबर २०१८ मध्ये अन्न आणि कृषी संघटनेच्या सहकार्याने स्वीकारला होता. हा दिवस साजरा करण्याचा उद्देश्य म्हणजे अन्न सुरक्षा मानक राखण्यासाठी जन जागृती करणे आणि अन्नजन्य आजारांमुळे होणाऱ्या मृत्युदर कमी करणे. संयुक्त राष्ट्र संघाने आपल्या दोन संस्था अन्न आणि कृषी संघटना (Food and Agriculture Organization- FAO) आणि जागतिक आरोग्य संघटन (World Health Organization- WHO) ला जगभरातील अन्न सुरक्षेला चालना देण्यासाठी नियुक्त केल्या आहेत. अन्न सुरक्षा का आवश्यक आहे आणि ती कशी मिळवता येऊ शकते? यावर चर्चा करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी मार्गदर्शक तत्त्वे विकसित केली आहेत. सरकारने सर्वांसाठी सुरक्षित आणि पौष्टिक जेवण सुनिश्चित केले पाहिजे. कृषी आणि अन्न उत्पादनामध्ये चांगल्या पद्धती राबविण्याची गरज आहे. व्यावसायिकाने अन्न पदार्थ सुरक्षित असल्याची खात्री द्यावी. सर्व ग्राहकांना सुरक्षित, निरोगी आणि पौष्टिक आहार मिळविण्याचा हक्क आहे. सुरक्षित, पौष्टिक आणि पुरेसे अन्न चांगल्या आरोग्यास प्रोत्साहित करतं. त्याच बरोबर उपासमारीची समस्या दूर करतं. भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (Food Safety and Standards Authority of India- FSSAI) ने राज्यांद्वारे सुरक्षित अन्न पुरवठा करण्यासाठी प्रयत्नासाठीच्या संदर्भात राज्य अन्न सुरक्षा इंडेक्स (State Food Safety Index- SFSI) विकसित केले आहेत. या निर्देशकांच्या माध्यमाने अन्न सुरक्षेच्या पाच निकषांवरील राज्यांच्या कामगिरीचे मूल्यांकन केले जाते. या श्रेणी मध्ये खालील निकषांचा समावेश आहे.


* मानव संसाधन आणि संस्थात्मक व्यवस्थापन अंमलबजावणी, अन्न चाचणी पायाभूत सुविधा आणि देखरेख.

* प्रशिक्षण आणि क्षमता वाढविणे.

* ग्राहक सशक्तीकरण.

* एका अभिनव आणि बॅटरीने चालणारे रमन १.० नावाच्या डिव्हाईस ला बाजारपेठेत आणले आहेत. हे डिव्हाईस एका मिनिटापेक्षा कमी वेळेत खाद्य तेल, चरबी आणि तुपामधील केलेली भेसळ शोधण्यात सक्षम आहे.

* शाळांकडे अन्न सुरक्षेचा मुद्दा नेण्यासाठी ‘फूड सेफ्टी मॅजिक बॉक्स’ नावाच्या नव्या समाधानाची सुरुवात केली गेली आहे.

* या किट मध्ये स्वतःच अन्न मध्ये भेसळ असल्याची तपासणी करण्यासाठी मॅन्युअल आणि एक डिव्हाईस लागले आहे.

* FSSAI ने विद्यापीठ, शाळा, महाविद्यालये, संस्था, कार्यस्थळे, संरक्षण आणि अर्ध-सैन्य प्रतिष्ठान, रुग्णालये, कारागृह सारख्या ७ संकुलांना 'ईट राइट कॅम्पस' म्हणून घोषित केले आहे.

* FSSAI ने अन्न कंपन्या आणि व्यक्तींचे योगदानाला ओळख देण्यासाठी ‘ईट राइट अवार्ड’ ची स्थापना केली आहे. जेणे करून नागरिकांना सुरक्षित आणि आरोग्यासाठी अन्न निवडण्यामध्ये सशक्त बनवणे.

अन्न वाया घालवू नका. आपल्याला जेवढे लागते तेवढेच घ्या. 'आज मी पोटभरून जेवण केलं, नाहीतर आज मी उपाशी राहिलो असतो' हे ज्याला कळलं तो कधीही अन्नाची नासाडी करू शकत नाही, कारण त्याला त्या अन्नाच महत्व कळलेलं असतं. अन्न हेच पूर्णबह्म. चला स्वच्छ आणि सुरक्षित अन्नपदार्थांना प्राधान्य देऊ.

दिनविशेष :- 07 जून - जागतिक पोहा दिन

दिनविशेष :- 07 जून - जागतिक पोहा दिन



संपूर्ण वर्षभराचे दिनविशेष पहा. Click Here


७ जून हा 'जागतिक पोहा दिन' म्हणून साजरा केला जातो. प्रत्येक प्रदेशानुसार, पोहे करण्याची पद्धती आणि चव बदलते. पोह्याचा नाश्ता चविष्ट तसेच आरोग्यदायी देखील आहे. जे डायटिंग करतात, त्यांच्यासाठी पोह्यांचा नाश्ता आरोग्यदायी समजला जातो. महाराष्ट्र, ओडिसा, मध्य प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, गुजरात, राज्यस्थान मध्ये पोह्याचा नाश्ता प्रसिद्ध आहे. तज्ञांच्या मते पोह्यात ७६.९ टक्के कार्बोहाड्रेटस आणि २३.१ टक्के प्रोटीन असते. वजन कमी करण्यासाठी पोहे फायदेशीर मानले जातात. पोहे दिनानिमित्त पोहे खाण्याचे आरोग्यदायी फायदे जाणून घेऊया.


कार्बोहाड्रेटस चा उत्तम स्त्रोत

पोह्यात ७६.९ टक्के कार्बोहाड्रेटस असतात. तसेच पोह्यात २३ टक्के फॅट्स असतात. कार्बोहाड्रेटस मुळे शरीराला ऊर्जा मिळते. त्यामुळे सकाळी पोह्याचा नाश्ता आरोग्यदायी मानला जातो.


शरीराला लोहाचा पुरवठा होता

पोह्यात लोहाचे प्रमाण भरपूर असते. पोहे तयार करण्याच्या प्रक्रियेत तांदळावरून लोखंडी रूळ फिरवले जातात. या प्रक्रियेत लोह्याचा अंश पोह्यात शिरतो. त्यामुळे यात लोहाचे प्रमाण अधिक असते.


रक्तातील साखरेवर नियंत्रण

मधुमेहाच्या रुग्णांसाठी पोह्यांचा नाश्ता आरोग्यदायी मानला जातो. पोह्यात फायबरचे प्रमाण अधिक असते. पोह्याच्या सेवनाने रक्तातील साखर नियंत्रित होण्यास मदत होते.


पचनास हलके

पोह्यांचा नाश्ता पचनास हलका असतो. त्यामुळे सकाळच्या नाश्त्यात त्याचा समावेश केला जातो. पोह्यामुळे पोट भरलेले राहते आणि भूक कमी लागते.


लठ्ठपणा येत नाही

पोहे खाल्ल्याने लठ्ठपणा वाढत नाही. एक वाटी पोह्यामध्ये कमीत कमी २५० कॅलरीज असतात. तसेच त्या मध्ये व्हिटामिन, मिनरल, अँटी ऑक्सिडंट असतात.

दिनविशेष :- 07 जून - पहिल्या क्रिकेट विश्वचषकाची सुरुवात

दिनविशेष :- 07 जून - पहिल्या क्रिकेट विश्वचषकाची सुरुवात



पहिल्या वहिल्या क्रिकेट विश्वचषकास क्रिकेटची पंढरी लॉर्ड्स (इंग्लंड) येथे ७ जून १९७५ रोजी सुरुवात झाली. पहिलाच सामना भारत आणि इंग्लंड दरम्यान खेळवण्यात आला. ७ जून १९७५ ते २१ जून १९७५ दरम्यान खेळल्या गेलेल्या विश्वचषकाच्या मालिकेला मुळात नाव ‘प्रुडेन्शियल कप’ असे देण्यात आले होते. या पहिल्या वहिल्या विश्वचषकात केवळ आठ संघांचा समावेश होता. एकदिवसीय सामन्यांच्या या विश्वचषका मध्ये सहा संघ हे ‘कसोटी’ दर्जा असलेले संघ होते, त्यामुळेच ६० षटकांच्या या एकदिवसीय सामन्या।मध्ये भल्या भल्या संघाची भंबेरी उडाली. आठ संघांना दोन भागा मध्ये विभागण्यात आले होते. गट अ’ मध्ये इंग्लंड, न्यूझीलंड, भारत, पूर्व आफ्रिका, संघाचा समावेश होता तर गट 'ब’ मध्ये वेस्ट इंडीज, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, श्रीलंका संघाचा समावेश होता. या स्पर्धे मध्ये दोन मुख्य टप्पे होते. पहिला टप्पा म्हणजे राऊंड रॉबिन म्हणजेच प्रत्येक गटा मधील संघ क्रमवारी प्रमाणे प्रत्येक संघाशी सामना खेळेल. या पहिल्या दोन संघांना दुसऱ्या टप्प्या मध्ये प्रवेश मिळत होता. दुसरा टप्पा म्हणजे बाद फेरी (नॉकआऊट राऊंड). इंग्लंड मध्ये खेळल्या गेलेल्या या पहिल्या विश्वचषका मध्ये एकूण ३६ सामने खेळले गेले. यामध्ये दोन उपांत्य सामने आणि एका अंतिम सामन्याचा समावेश आहे. आठ संघा पैकी श्रीलंका आणि पूर्व आफ्रिका संघांना कसोटी संघाचा दर्जा नव्हता. पहिल्याच सामन्यात भारताने अभूतपूर्व असा पराक्रम केला. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने ६० षटकांत भारतीय गोलंदाजांना धू धू धूत ४ बाद ३३४ धावा केल्या. यात डेनिस अमिसचे शतक आणि कीथ फ़्लेचरचे अर्धशतक होते. दोघांनी अनुक्रमे १३७ (१४७) आणि ६८ (१०७) धावा केल्या. पण शेवटच्या षटकांत माईक डेनिस आणि ख्रिस ओल्ड यांनी तुफ़ान फटकेबाजी केल्याने इंग्लंड ३००च्या पलीकडे पोचले. डेनीसने ३१ चेंडूत ३७ धावा केल्या तर ओल्डने ३० चेंडूत तब्बल ५१ धावा केल्या. यानंतर फलंदाजीला उतरलेल्या भारतीय फलंदाजांनी इंग्लिश खेळाडूंना अक्षरशः तरसवले, त्यांच्याच भूमीत जन्माची अद्दल घडवली. ६० षटकांत ३३५ धावांचे आव्हान घेऊन उतरलेले भारतीय खेळाडू धड धावाही काढत नव्हते आणि बादही होत नव्हते. एकाही भारतीय खेळाडूने शतक किंवा अर्धशतक केले नाही, पण सर्व ६० षटके खेळून इंग्लिश खेळाडूंचा घामटा काढला. 


समालीच्या जोडीतील एकनाथ सोलकरने ८ धावा काढण्यासाठी तब्बल ३४ चेंडू घेतले. त्यात एकही चौकार नव्हता. त्यानंतर आलेला अंशुमन गायकवाडने थोडीफार धुंव्वाधार फलंदाजी केली आणि झोपेत असलेल्या इंग्लिश खेळाडू मध्ये थोडी जान आणली. अंशुमन गायकवाडची धुंवाधार फलंदाजी म्हणजे २२ धावा करण्यासाठी फक्त ४६ चेंडू घेतले त्यात तब्बल २ चौकार होते. यालाच त्यावेळी त्यातल्या त्यात धुंवाधार फलंदाजी म्हटले जाई. पुढे अंशुमन गायकवाड बाद झाल्यावर मैदानात आलेल्या गुंडापा विश्वनाथने गायकवाड पेक्षा तुफ़ानी फलंदाजी केली आणि गायकवाडच्याही पुढे जाऊन आपले नाव ठळक केले. आता गायकवाड पेक्षाही धुंवाधार म्हणजेच जिंकण्यासाठी प्रतिषटक ७ ते ८ धावांची धावगती आवश्यक असताना ३७ धावा करण्यास ५९ चेंडू घेणे आणि त्यात ५ चौकार मारणे होय. शेवटी विश्वनाथही ५ चौकार मारून दमून गेला होता, म्हणून विश्रांतीसाठी ओल्डच्या गोलंदाजीवर झेल देऊन तंबूत परतला. आता आला तो ब्रिजेश पटेल. जिंकण्यास प्रतिषटक तब्बल ८ पेक्षाही जास्त धावा हव्या असताना पटेलने करावे काय? १६ धावा करण्यास फक्त ५७ चेंडू घेतले आणि इंग्लिश खेळाडूंना फार दमावे लागू नये म्हणून एकही चौकार मारला नाही. हे सर्व एका बाजूला सुरू असताना आपला एक सलामीचा फलंदाज दुसऱ्या बाजूला पाय रोवून खेळपट्टीवर उभा होता. इतका पाय रोवून उभा होता की सामना संपे पर्यंत हा खेळाडू बादही झाला नव्हता. सबंध ६० षटके खेळून काढून या पठ्ठ्याने संपूर्ण डावात ३६ धावा केल्या होत्या. त्यासाठी याने घेतले फक्त १७४ चेंडू आणि त्यात एका चौकाराचाही समावेश होता हे त्याहून आणखी विशेष बरं का? ६० षटका मधील १७४ चेंडू म्हणजे भारताच्या एका डावा पैकी अर्धा डाव यानेच खेळून काढला होता आणि भारताने ६० षतकांत केलेल्या १३२ धावांत याच्या ३६ धावा समाविष्ट होत्या. आता सबंध एक डाव खेळून, १७४ चेंडूत ३६ धावा करणारा हा महान खेळाडू कोण बरे असावा? असा प्रश्न नक्कीच पडला असेल नाही? खरंच हा खेळाडू महान होता आणि हाच तो भारताचा महान सलामीवीर लिटिल मास्टर सुनील गावस्कर, ज्याने जिंकण्यास ६० षटकांत ३३५ धावा हव्या असताना १७४ चेंडूत ३६ धावा केल्या होत्या, आणि त्याही नाबाद ३६. आता जिंकण्यासाठी ३३५ धावा आवश्यक असताना अशी धुंवाधार, तडाखेबंद फलंदाजी केल्यावर सामन्याचा निकाल काय असेल हे सांगायलाच पाहिजे का? इंलंडने भारतावर या सामन्यात २०२ धावांनी विजय मिळवला. ही अशी होती विश्वचषकाची सुरुवात. विश्वचषकाच्या अंतिम सामन्या मध्ये वेस्ट संघाने ऑस्ट्रेलिया संघासमोर २९२ धावांचे आव्हान ठेवले होते परंतु ऑस्ट्रेलिया संघ २७४ धावा मधेच सर्वबाद झाला. अटीतटीच्या झालेल्या या सामन्या मध्ये वेस्टइंडीज संघाने १७ धावांनी विजय मिळविला. क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या लॉर्ड्स मैदानावर वेस्ट इंडीज संघाचा कर्णधार क्लाईव्ह लॉईडने पहिला विश्वचषक दिमाखात उंचावला.

दिनविशेष :- 16 जून - वर्ल्ड रिफिल डे

दिनविशेष :- 16 जून - वर्ल्ड रिफिल डे संपूर्ण वर्षभराचे दिनविशेष पहा. Click Here टिकाऊ पर्यायांचा अवलंब केल्याने कचरा कमी होतो, संसाधनांचे सं...