Tuesday, 6 May 2025

दिनविशेष :- 02 जून - अलेक्झांडर ग्राहम बेल चा टेलिफोन शोध

दिनविशेष :- 02 जून - अलेक्झांडर ग्राहम बेल चा टेलिफोन शोध


संपूर्ण वर्षभराचे दिनविशेष पहा. Click Here


अलेक्झांडर ग्राहम बेल यांचा जन्म ३ मार्च १८४७ रोजी स्कॉटलंड मधील एडिनबरा येथे झाला. त्यांचे आजोबा, वडील अलेक्झांडर मेलव्हिल बेल आणि भाऊ या सगळ्यांचा मूक-बधिरांच्या शिक्षणाशी जवळचा संबंध होता. तर त्यांची आई आणि पत्नी या दोघीही कर्ण बधिर होत्या. लहानपणी अलेक्झांडर हे नाव ठेवण्यात तरी वयाच्या ११ व्या वर्षी स्वतःच्या नावात ग्रॅहॅम नाव टाकून घेऊन मग अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल या नावाने पुढे ते ओळखले जाऊ लागले. मूक-बधिरांसाठी शिक्षण सुलभ व्हावे, त्यांना इतरांचे बोलणे कळावे यासाठी अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल सतत प्रयत्नशील होते. त्यासाठी बोस्टन विद्यापीठात स्वरयंत्राचे कार्यशास्त्र शिकविण्यासाठी नेमण्यात आले. तेथेच बधिरांसाठी यंत्र तयार करण्याचे प्रयत्न बेल करीत होते. असे यंत्र बनविण्याच्या प्रयत्नात बेल असतांनाच ते मेबल ह्यूबर्ड नावाच्या कर्ण बधिर मुलीच्या प्रेमात पडले आणि तिच्याशी त्यांचा विवाह झाला. पत्नीला बेलच्या यंत्रा विषयी कळल्यावर तिनेच ओठांची हालचाल वाचता येणे हाच बधिरांसाठी कसा सर्वोत्तम पर्याय आहे हे पटवून सांगितले. मग बेल यांनी तसे यंत्र बनविण्याचे प्रयत्न सुरू केले आणि त्यातच दूरध्वनी यंत्राचे कोडे उलगडले. बेल यांनी माणसाच्या स्वरयंत्राचा आणि कानाचा अभ्यास करून पहिले दूरध्वनी यंत्र तयार केले. २ जून १८७५ या दिवशी आपले सहकारी वॉटसन यांच्यासह काम करीत असतांना दुसऱ्या खोलीतील वॉटसन यांच्या हाताच्या धक्याने ट्रान्समीटर थरथरला, तो लहानसा आवाजही बेल यांना ऐकू आला. मग बेल यांनी आपल्या ट्रान्समीटरचा उपयोग करून सहकारी वॉटसन यांना आपल्या खोलीत येण्या विषयी सांगितले. बेल यांचा तो संदेश सहकारी वॉटसन यांनी ऐकून तसा प्रतिसाद दिल्यावर संदेशाची देवाणघेवाण झाल्याबद्दल दोघांची खात्रीच पटली. बेल आणि वॉटसन यांनी या यंत्रावर आणखी प्रयोग करून १५-०२-१८७६ या दिवशी आपल्या यंत्राचे पेटंट घेण्यासाठी अर्ज दाखल केला. तेव्हा पेटंट कार्यालयातच बेल यांना समजले की अशाच प्रकारच्या प्रयोगासाठी आणखी चार अर्ज पेटंट कार्यालयात पडून होते. हे पेटंट युद्ध बराच काळ सुरू होते, शेवटी बेल यांना दूरध्वनी यंत्राचे पेटंट मिळाले. बेल यांनी तयार केलेल्या आपल्या यंत्राचे प्रयोग अमेरिकेत आणि युरोप मध्ये केले. त्यानुसार नोव्हेंबर १८७७ साली बेल यांना बर्लीन शहरात दूरध्वनीचे जाळे पसरविले. १८८५ साली बेल यांनी द अमेरिकन टेलिफोन अँड टेलिग्राफ कंपनीची स्थापना केली. नंतर ही कंपनी बेल टेलिफोन कंपनी म्हणून ओळखली जावू लागली. २ ऑगस्ट १९२२ या दिवशी बेल यांचे निधन झाले. त्यांना श्रद्धांजली म्हणून समस्त अमेरिकेतील दूरध्वनी संच एक मिनीट बंद ठेवण्यात आले. विज्ञान विषयक सर्व प्रकारची माहिती नियतकालिकारुपाने जगाच्या समोर यावी या हेतुने १८८२ साली बेल यांनी सायन्स नावाचे नियतकालिक सुरू करण्यात पुढाकार घेतला तसेच आपल्या जवळील पैसा लावून हे नियतकालिक आठ वर्षे सतत सुरू ठेवले. पुढे हे नियतकालिक 'अमेरिकन असोसिएशन फॉर द ऍडव्हान्समेंट ऑफ सायन्स' या संस्थेचे अधिकृत नियतकालिक झाले. १८९८ ते १९०४ या काळात बेल नॅशनल जिओग्राफिक सोसायटीचे अध्यक्ष होते.

No comments:

Post a Comment

दिनविशेष :- 16 जून - वर्ल्ड रिफिल डे

दिनविशेष :- 16 जून - वर्ल्ड रिफिल डे संपूर्ण वर्षभराचे दिनविशेष पहा. Click Here टिकाऊ पर्यायांचा अवलंब केल्याने कचरा कमी होतो, संसाधनांचे सं...